अहमदनगर : चेन्नई येथील साईभक्त व्ही जितेंद्र यांनी ही सोन्याची आरती आज देणगी स्वरूपात साईबाबा संस्थानला दिली आहे. ही आरती साईबाबांच्या होणाऱ्या चारही आरतीत वापरण्यात येणार आहे. साईबाबांनी दिलेले बाबांना परत देत असल्याचे भाविकाचे म्हणणे आहे. जे मागितले ते बाबांनी दिले आहे, यामुळे बाबाने दिलेले आज बाबांना परत देत आहे. दरम्यान साईबाबा संस्थानला सोन्याची आरती देणाऱ्या व्ही जितेंद्र यांचा शॉल साई मूर्ती देवुन सन्मान करण्यात आला आहे.
साईबाबांना तब्बल एक कोटी रुपयांची देणगी : 2023 या नवीन वर्षाच्या सुरुवातीला साईबाबांना मोठे दान आले आहे. आज हैदराबाद येथील साईभक्त राजेश्वर यांनी साईबाबांना तब्बल एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर दुसरीकडे चेन्नई येथील साईभक्त व्ही जितेंद्र यांनी तब्बल 27 लाख 77 हजार 664 रुपय किमतीची सोन्याची आरती आज देणगी स्वरूपात साईबाबांना दिली आहे.
मेडीकल फंडसाठी २५ लाख : साईबाबांच्या चरणी रोज कोणत्याना कोणत्या प्रकारच्या दान स्वरूपाचा ओघ सुरूच असतो. हैद्राबाद येथील साईभक्त राजेश्वर यांनी साईबाबा संस्थानला मेडीकल फंडसाठी २५ लाख रुपयांचे चार डिमांड ड्राफ्ट अशी १ कोटी रुपये देणगी दिली आहे. या देणगीचे डिमांड ड्राफ्ट संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे सुपुर्त करण्यात आले आहेत.
सरत्या वर्षात 15 ते 20 कोटी : २६ डिसेंबरपर्यंत दक्षिणा पेटीत १६५ कोटी ५५ लाख, देणगी जमा झाली. तसेच, काउंटरवर ७२ कोटी २६ लाख जमा झाली. डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे ४० कोटी ७४ लाख जमा झालेली आहे. तर ऑनलाइन देणगीतून ८१ कोटी ७९ चेक व डीडीद्वारे १८ कोटी ६५ लाख रुपये जमा झाले आहेत. तसेच, मनीऑर्डरमधून १ कोटी ८८ लाख रुपये जमा झाले आहेत. विदेशी चलन खात्याचा परवाना नूतनीकरण प्रलंबित असल्याने कोट्यावधींचे विदेशी चलन पडून आहे. दरवर्षी या माध्यमातून जवळजवळ १५ ते २० कोटी रुपयांची देणगी मिळत असते.
जमा झालेल्या रकमेचा असा होतो उपयोग : भाविकांकडून मिळालेल्या देणगीतून संस्थान भक्तोपयोगी व समाजोपयोगी कामे केली जातात. यामध्ये साईनाथ रुग्णालयात निःशुल्क उपचार होतात. तसेच, प्रसादालयात मोफत अन्नदान करण्यात येते. दरम्यान, वर्षाकाठी दीड कोटी भाविक याचा लाभ घेतात. सध्या साई संस्थानात सुमारे सहा हजार कर्मचारी आहेत.