ETV Bharat / state

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी शिर्डी राहणार बंद; साईबाबा मंदिर खुलं - शिर्डी शहर बंद

Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil hunger strike) यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याचा निर्णय शिर्डीतील नागरिकांना घेतलाय. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिर्डी शहरातील दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. मात्र, साईबाबा मंदिर आणि साई संस्थानचे प्रसादालय व संस्थानच्या सर्व सुविधा भाविकांसाठी खुल्या राहणार आहेत.

Shirdi City Closed
शिर्डी बंद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 9:57 PM IST

शिर्डी बंदवर उपोषणकर्त्यांची भूमिका

शिर्डी (अहमदनगर) Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे दुसऱ्यांदा उपोषण सुरू केलंय. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळतोय. (Maratha reservation issue) शिर्डीतही गेल्या दोन दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण करण्यात येतंय. हे आंदोलन अजून तीव्र करण्यासाठी शिर्डीतील मराठा समाजाच्या वतीनं सोमवारी शिर्डी शहर बंद ठेवण्याची हाक दिलीय. साईबाबा मंदिर आणि साई संस्थानचे प्रसादालय व संस्थानच्या सर्व सुविधा भाविकांसाठी खुल्या राहणार आहेत. (Shirdi citizens support Jarange Patil)

शिर्डी नगरपरिषदजवळ साखळी उपोषण : मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देत शिर्डीतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी नगरपरिषदजवळ साखळी उपोषण सुरू केलंय. या साखळी उपोषणाचा रविवारी तिसरा दिवस होता. सायंकाळी शिर्डीतील साई निर्माण शैक्षणिक संकुलाच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'ईडब्ल्यूएस सर्टीफिकेट'सह शैक्षणिक कागदपत्रे जाळत यावेळी निषेध व्यक्त केलाय. त्याचबरोबर उपोषणस्थळापासून विद्यार्थ्यांनी तसेच उपोषणकर्त्यांनी शिर्डी शहरातून कँडल मार्च काढलाय. कँडल मार्च उपोषण स्थळाजवळ आल्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी शिर्डी शहर एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात येणार असल्याचे यावेळी मराठा आंदोलक विजय जगताप यांनी सांगितलं.

काय बंद? : शिर्डीतील सर्व व्यवसाय सोमवारी एक दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

काय सुरू?
1) साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं असणार आहे.
2) साईबाबा संस्थांचे सर्व भक्त निवास सुरू राहणार आहेत.
3) साईबाबा संस्थानचे साई प्रसादालय सुरू राहणार आहे.
4) साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शिर्डी बंदचा कुठलाही फटका बसणार नाही.
5) साईबाबा संस्थानच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा सुरू राहणार आहे.

हेही वाचा:

  1. MP Hemant Patil Resign : मराठा आरक्षणासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांचा राजीनामा; दिल्लीत करणार उपोषण
  2. Devendra Fadnavis On Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांची काळजी घ्या, देवेंद्र फडणवीसांचं आवाहन
  3. Maratha Reservation : समाजाच्या मृतदेहांवर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.