शिर्डी - काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाळणा दुर्घटनेत जखमी झालेल्या शिर्डी येथील साळवे व साबळे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. उपस्थित होते.रामनवमीच्या उत्सवानिमित्त शिर्डीत देशभरातील भाविकांची मोठी गर्दी असते. याचबरोबर स्थानिक ग्रामस्थ व साई भक्तांचा मोठा सहभाग असलेल्या या उत्सवात यात्रेचे स्वरूप असते.
शिर्डी येथील अत्यंत गरीब साळवे व साळुंके कुटुंबातील सदस्यांनी या यात्रेचा आनंद घेण्यासाठी पाळण्यात बसले. यावेळी ब्रेक डान्स प्रकारचा हा पाळणा असल्याने तो पाळणा तुटून त्यामध्ये साळुंके व साळवे कुटुंबियातील पाच जण जखमी झाले आहेत. यातील किशोर साळुंखे यांच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. त्यांचे नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्ही कुटुंबांची आमदार बाळासाहेब थोरात यांनी आस्तेवाईक पणे चौकशी करून या कुटुंबीयांना दिलासा दिला.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, रामनवमीचा उत्सव हा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील मोठा उत्सव शिर्डीमध्ये असतो. यानिमित्त जगभरातून भाविक येत असतात आणि स्थानिक नागरिक, गोरगरीब नागरिक या उत्सवात आनंदाने सहभागी होतात.यात्रेचे स्वरूप असल्याने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पाळणा दुर्घटना ही पाळणा मालकाच्या बेजबाबदारीतून झालेली असून त्याने वेळीच काळजी घेणे गरजेचे होते. सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाचे असून अशा दुखापती किंवा दुर्घटना होणे अत्यंत चिंताजनक आहे. सदर कुटुंबीयांना एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटल धामणगाव येथे वैद्यकीय उपचाराच्या सुविधा करून देण्यासाठीच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
यावेळी थोरात यांच्यासमवेत डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन चौगुले, लताताई डांगे, ॲड. पंकज लोंढे, उमेश शेजवळ नितीन शेजवळ नितीन धीवर सचिन गायकवाड नाना त्रिभुवन साई पटाले नवीन शेजवळ रवी शेजवळ समीर शेख सुमित शेळके समीर शेख संतोष वाघमारे विक्रांत दंडवते अविनाश दंडवते उत्तमराव मते अविनाश शेजवळ यव्हान गायकवाड अमृत गायके आदी उपस्थित होते.