ETV Bharat / state

Shirdi Saibaba : पर्यावरण रक्षणाचा संदेश जपत 'साई संस्थान'चे प्रशासकीय कामकाज झाले 'पेपरलेस' - देशातील नंबर दोनचे तिर्थक्षेत्र

शिर्डीचे साई बाबा संस्थान महाराष्ट्रातील नंबर एक आणि देशातील नंबर दोनचे तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. या संस्थानने आपले संपूर्ण कामकाज पेपरलेस केले आहे. या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष वाचणार असून साई बाबांनी स्वतः वृक्ष संगोपनचा संदेश दिल्याचे साई संस्थानकडून सांगण्यात आले.

Shirdi Administrative Paperless Work
शिर्डी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 8:59 PM IST

शिर्डी संस्थानच्या पेपरलेस कामकाजाविषयी माहिती देताना अधिकारी

अहमदनगर (शिर्डी): साई संस्थानात वर्षाकाठी येथे कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली जाते. तसेच जवळपास तीन कोटी पेक्षा भाविक वर्षभरात साई मंदिरात दर्शनासाठी येतात. साई संस्थानचा कारभारही तसा मोठा आहे. येथे उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली जिला प्रधान न्यायधिशांची तदर्थ कमेटी असून आएएस दर्जाचा सनदी अधिकारी येथे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी नियुक्त आहे. संस्थानच्या 44 विभागातून दिवसभरात अनेक फाईल्सचा वावर येथील कार्यालयात असतो. मात्र आता हे सर्व कामकाज पेपरलेस करण्यात आले आहे. राज्य सरकारने मागेच प्रशासकीय कारभार ई-ऑफिस करत पेपरसेल केला जाईल, असे घोषित केले होते. त्यानंतर आता साई संस्थानने राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत आपले देखील सर्व कारभार पेपरलेस केले. या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष वाचणार असून साई बाबांनी स्वतः वृक्ष संगोपनचा संदेश दिल्याचे साई संस्थानकडून सांगण्यात आले.

संस्थानला स्वच्छतेसाठीचे ISO नामांकन: साईबाबा संस्थानला स्वच्छतेसाठीचे ISO नामांकन मिळलंय. हे ISO नामांकन साईबाबा संस्थानच्या साई प्रसादलय आणि भक्त निवासाला मिळाल्याने शिर्डीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षाकाठी करोडो तर दररोज 60 ते 70 हजार भाविक येतात. त्याचबरोबर उत्सव काळात साईबाबा प्रसादलयात 80 ते 90 हजार भाविक भोजनाचा अस्वाद घेतात.

ISO नामांकनाचे नूतनीकरण : आशियातील सर्वात मोठे प्रसादालय साई संस्थान चालवले जाते. साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयाला 2010 मध्ये ISO नामांकन मिळाले होते. तसेच साईबाबा संस्थानच्या साई आश्रम, भक्त निवास, साई प्रसादालय, भक्त निवास, दारावती भक्त निवास यांना देखील चांगली स्वच्छता राखण्यासाठी 2014 मध्ये ISO नामांकन मिळाले होते. साईबाबा संस्थानाच्या स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी दरवर्षी ISO अधिकारी शिर्डीत येतात. त्यानंतर दरवर्षी ISO नामांकनाचे नूतनीकरण केले जाते.

साई भक्ताने उचलला खर्च : दरम्यान, या आयएसओ नामांकनाच्या नूतनीकरणाचा खर्च बेंगळुरू येथील साई भक्त केशू मूर्ती यांनी उचलला आहे. साईबाबा संस्थानला हे आयएसओ नामांकन प्रमाणपत्र आज देण्यात आले आहे. साईभक्त केशू मूर्ती यांनी हे आयएसओ प्रमाणपत्र आज साई संस्थानला दिले आहे. साईबाबा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी आयएसओ प्रमाणपत्र स्विकारले आहे.

साईबाबा संस्थान नंबर वन : गेल्या 14 वर्षात साईबाबा संस्थान स्वच्छतेच्या बाबतीत नंबर वन झाले आहे. साई संस्थेचे आयएसओ नामांकन मिळवण्यासाठी साई संस्थेचे अध्यक्ष सुधाकर येरलागड्डा, साई संस्थेचे सीईओ पी. शिवा शंकर, डेप्युटी सीईओ राहुल जाधव यांच्यासह साई संस्थेचे प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले, साई प्रसादालयाचे प्रमुख विष्णू थोरात आणि कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

हेही वाचा:

  1. शिर्डीच्या साईबाबा संस्थानला मिळाले स्वच्छतेसाठी 'आयएसओ' नामांकन
  2. Donation Of Mahindra And Mahindra: महिंद्रा अँण्ड महिंद्रा कडून साई संस्थानला 15 गाड्या भेट; आजही 27 लाखांची गाडी भेट
  3. Draupadi Murmu dined at Sai Prasadalaya: शिर्डीच्या साई प्रसादालयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतला भोजनाचा आस्वाद; शेंगदाण्याच्या चटणीची केली प्रशंसा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.