ETV Bharat / state

Shinde group spokesperson Deepak Kesarkar : गद्दार म्हणताना दहा वेळा विचार करावा; आम्ही बाळासाहेब, उद्धव ठाकरेंचा मान ठेवतो - दीपक केसरकर - Two Thirds to MLA Shinde group

शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Shiv Sena Rebel Leader Eknath Shinde ) यांनी बंड केल्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन करून मुख्यमंत्री पदाचा कार्यभारदेखील स्वीकारला. त्यांच्याकडे आता शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार ( Two-thirds to MLA Shinde group ) आहेत. उरलेल्या 16 आमदारांपैकी आदित्य ठाकरेंना ( Aditya Thackeray ) वगळून 15 आमदारांवर आपात्रतेच्या कारवाईचा बडगा उचलला आहे. विधिमंडळ पक्ष म्हणून शिंदे गटाकडेच अधिकार असल्याने त्यांनी या कारवाईचा बडगा उचलला आहे. ( Shinde group spokesperson Deepak Kesarkar )

spokesperson Deepak Kesarkar
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर
author img

By

Published : Jul 8, 2022, 1:17 PM IST

शिर्डी (अहमदनगर) : शिवसेनेतून तब्बल दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी ( Two-thirds to MLA Shinde group ) केल्याने शिवसेनेला जोरदार झटका बसला आहे. एकनाथ शिंदेंच्या ( Shiv Sena Rebel Leader Eknath Shinde ) नेतृत्वाखाली हे आमदार सत्तेत आले आहेत. सत्तांतरानंतर आमदारांकडून पुन्हा मातोश्रीवर जाण्याचे संकेत दिले जात आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंकडून आमदारांना गद्दारही म्हटले जात असल्याने शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) अद्यापि आम्हाला गद्दार म्हणत असतील तर त्यांनी उद्धव ठाकरेंची भाषा शिकावी संजय राऊतांची भाषा शिकू नये, असा सल्ला आदित्य ठाकरे यांना केसरकरांनी ( Shinde group spokesperson Deepak Kesarkar ) शिर्डीत साईबाबा दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना दिला.

शिंदे गटाकडून किरीट सोमय्यांना समज : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माफिया म्हणत वादग्रस्त ट्विट किरीट सोमय्या यांनी केले. हा एक कटू प्रसंग आहे. मात्र, आम्ही आधीच भाजपकडून आमचे नेते उद्धव ठाकरे यांना कोणीही डिवचू नये, अपशब्द वापरू नये हा शब्द घेतला आहे. त्यावेळी भाजपचे सर्व आमदार, नेते, शिंदे गटाचे नेते, आमदार यांच्या समक्ष आम्ही शब्द घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी आमची भावना समजून घेत बैठकीतील सर्वांना सांगत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोणीही अपशब्द बोलणार नाही याची खात्री दिली होती. मात्र, दुर्दैवानं त्या बैठकीला किरीट सोमय्या हजर नव्हते. तेव्हा लवकरच उपमुख्यमंत्री फडणवीस यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करतील. किरीट सोमय्यांच्या ट्विटमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर पक्षश्रेष्ठी सोमय्यांना योग्य ती जाणीव करून देतील, असे स्पष्ट मत केसरकर यांनी यावेळी व्यक्त केले.

आदित्य ठाकरेंनी वडिलांची भाषा शिकावी : आदित्य ठाकरे खूप लहान आहेत. मी त्यांच्यापेक्षा दुपट्ट वयाचा आहे. मात्र, आदित्य ठाकरे समोर आले, तर मी स्वतः उठून उभा राहतो कारण ते बाळासाहेबांचे नातू आहेत. आदित्य यांना जो मान देतो तो बाळासाहेबांचा मान आहे. आदित्य ठाकरे जर बाळासाहेबांचे नातू असतील, तर असा शब्द तोंडी येताना त्यांनी दहावेळा विचार करायला हवा. आम्ही खूप बोलू शकतो मात्र बोलणार नाही. कारण बाळासाहेबांचा वारसा त्यांच्याकडे आला आहे. तेव्हा त्यांनी कसे बोलावे हे उद्धव ठाकरे यांच्याकडून शिकावं, संजय राऊत यांच्याकडून शिकू नये, असा सल्ला यावेळी केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.

भावना गवळी यांना हटवणे मनाला लागणारे : भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोप पदावरून दूर केल्याचं कारण संजय राऊत जरी वेगळं सांगत असतील तरी फक्त खासदार फुटतील अशा संशयापोटी ही कारावाई केली असल्याने शिवसैनिकांच्या मनाला लागलं आहे. बाळासाहेबांनी खासदार भावना गवळी यांना मुलगी मानलं होतं. ते असते तर कुणी त्यांना पदावरून हटवू शकलं नसतं.

भावना गवळी शिवसेनेच्या पहिल्या खासदार : त्या शिवसेनाच्या पहिल्या खासदार असून पाच वर्षे त्यांनी नेतृत्व केले आहे. त्यांना जेव्हा पदावरून काढले गेले, तेव्हा तो समस्त महिला वर्गाचा अपमान आहे. लोकशाहीमध्ये खासदारांना जो निर्णय घ्यायचा आहे, त्यांना ती मोकळीक आहे. जर बहुमत भाजपसोबत जात असेल, तर उद्धव ठाकरे यांनीही सहानुभूतीपूर्वक विचार करावा. मी यावर फार काही बोलू शकतं नाही. नाहीतर त्यांचे प्रवक्ते म्हणतील आम्हीच खासदारांना फूस लावली, असा टोला यानिमित्ताने केसरकर यांनी राऊतांना लगावला आहे.

शिंदे गटाकडून अपात्रतेची कारवाई : शरद पवारांसह इतर अनेक नेत्यांनी राज्यात मध्यवर्ती निवडणुकांचे संकेत दिले आहे. यावर बोलताना केसरकर यांनी म्हणाले की, शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून शिंदे यांना मान्यता आहे. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये व्हीप मोडला गेला. आमचे आदित्य ठाकरे यांच्यावर प्रेम आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी 16 ऐवजी 15 आमदारांवर अपात्रतेची कारवाईचा बडगा उगारला आहे.

मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार : जे नेहमी निवडणुकांबद्दल बोलतात त्यांना 15 जागेवर निवडणुका झाल्या की समजेल जनतेच्या मनात काय आहे. मात्र, अपात्रतेची कारवाई होणा-या आमदारांना शिंदे गटाकडे येण्याची संधी आहे. एकनाथ शिंदे त्यांना माफ करू शकतात त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात मध्यवर्ती निवडणुकांची ट्रायल असेल तर ती ट्रायल नक्की करू, असे आवाहनच दीपक केसरकरांनी दिले आहे.

हेही वाचा : Uddhav Thackeray Led Faction : एकनाथ शिंदेंच्या सरकार स्थापनेविरोधात उद्धव ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयात धाव

हेही वाचा : Rahul Narvekar on Governors constitutional right : विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याचा राज्यपालांना घटनात्मक अधिकार- राहुल नार्वेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.