ETV Bharat / state

Vikhe Patil Sharply Criticized Sharad Pawar : शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावं : आमदार राधाकृष्ण विखे पाटील - Different Picture will Emerge soon

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार पडून ( Maha Vikas Aghadi government fell Dawn ), भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन ( BJP-Shinde group Government ) झाले. त्यानंतर शरद पवार यांनी आगामी काळात एक वेगळे चित्र पाहण्यास ( Different Picture will Emerge soon ) मिळेल, असा दावा केला होता. तत्पूर्वी त्यांनी मध्यवर्ती निवडणुकांना सामोरे जाण्याचा कार्यकर्त्यांना सल्लाही दिला होता. याचा समाचार घेताना राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर टीका केली. ( Vikhe Patil Sharply Criticized Pawar Statement ) त्यांना आत्मपरीक्षण ( Sharad Pawar should Introspect )करण्याचा सल्लाही दिला आहे.

MLA Radhakrishna Vikhe Patil
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
author img

By

Published : Jul 14, 2022, 4:13 PM IST

शिर्डी : राज्यात सत्तांतर झालेले काही लोकांना आवडलेले नाही. त्यामुळे आगामी काळात लवकरच एक वेगळे चित्र पाहण्यास मिळेल ( Different Picture will Emerge soon ) , असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला होता. पवारांच्या या वक्तव्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरमरीत टीका केली ( Vikhe Patil Sharply Criticized Pawar Statement ) आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना युतीत निवडणूक लढले होते, त्यावेळी विश्वासघात केला गेला. खरं तर शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावे, असे विखे पाटील यांनी शिर्डीत साईबाबा दर्शनानंतर म्हटले आहे.

महाराष्ट्राला जनतेच्या मनातलं सरकार मिळाले : महाराष्ट्राला लोकांच सरकार मिळाले असून, जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अडीच वर्षांत समाजातील कोणताच घटक समाधानी नव्हता. कारण महाविकास आघाडी सरकार हे विश्वासघाताने आलेले सरकार होते. मात्र, पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र नोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार संभाळत आहे. जनतेच्या अपेक्षा हे सरकार पूर्ण करेन, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना गुरुपौर्णिमा निमित्ताने साईबाबांनी शक्ती द्यावी, अशी प्रार्थना केल्याचे विखे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

शिवसेनेला उशिरा सुचलेले शहाणपण : राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठींबा जाहीर केला आहे. हे स्वागतार्हच असून, शिवसेनेला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हा पाठिंबा कोणत्या मजबुरीनं दिला हे माहीत नाही, मात्र बहुतांश खासदारांची मागणी होती तेव्हा लोकप्रतिनिधी किंवा खासदारांच ऐकावं लागतं. आणि हे आता शिवसेनेच्या नेतृत्वाला समजायला लागले आहे, असे म्हणत आमदार विखे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

पवारांनी आत्मपरिक्षण करावं : शरद पवार यांनी राज्यातील सत्ता परिवर्तन लोकांना आवडलेलं नाही. त्यामुळे आगामी काळात लवकरच एक वेगळे चित्र पाहण्यास मिळेल, असा दावा केला आहे. यावर बोलताना विखे पाटील यांनी शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावे, अशी टीका केली आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेना भाजप युतीत निवडणूक लढवली. त्यात 160 पेक्षा आधिक जागा जिंकल्या, अशा वेळी महाविकास आघाडी सरकार स्थापन करून विश्वासघात कोणी केला याचे आत्मचिंतन त्यांनी स्वतः करावे, अशी टीका विखे पाटील यांनी यावेळी केली.

सत्तेत असताना विचारले नाही मग आता काय : औरंगाबाद नामकरण आणि द्रौपदी मुर्म यांना पाठींबा देताना उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसला विचारलं नसल्याचे काल बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते. यावर बोलताना विखे पाटील यांनी थोरातांवर टीका करीत सत्तेत असताना तुम्हाला कधी विचारलं नाही, त्यावेळी नगण्य स्थान हे कॉंग्रेस मंत्र्यांना होते. याचेच दुःख आणि शल्य कॉंग्रेस मंत्र्यांना आहे, जे त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहे. अर्थप्राप्तीसाठी कॉंग्रेसचे मंत्री महाविकास आघाडीमध्ये होते, असा टोला विखे पाटील यांनी थोरातांना नाव न घेता लगावला आहे.

हेही वाचा : Draupadi Murmu Mumbai Visit : एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत !

हेही वाचा : Maharashtra and India Rain live : देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस ! गुजरात आणि महाराष्ट्रात रेड अलर्ट, पाहा पावसाची स्थिती

हेही वाचा : Maharashtra Live Breaking News : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद, मंत्रिमंडळातील निर्णय करणार जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.