ETV Bharat / state

पद्मश्री पुरस्काराने सन्मान झाल्यानंतर राहीबाई पोपेरे प्रथमच पोहचल्या साईबाबांच्या दरबारी

पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर बीजमाता राहीबाई पोपेरे (seedmother Rahibai Popere) दिल्लीतून थेट शिर्डीत साईदर्शनासाठी दाखल झाल्या. पुरस्कारानंतर प्रथमच राहीबाईंनी साईबाबांचे दर्शन घेतले. हा पुरस्कार माझ्या काळ्या मातीचा असुन गावरान बीज संवर्धनाचे काम देशभर पोहचावे यासाठी साईबाबांकडे प्रार्थना केल्याचे राहीबाई म्हणाल्या. दरम्यान शिर्डीकरांनी राहीबाईंचे जल्लोषात स्वागत करत साई नामाचा जयघोष केला.

राहीबाई पोपेरे
राहीबाई पोपेरे
author img

By

Published : Nov 12, 2021, 7:05 PM IST

Updated : Nov 12, 2021, 7:52 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील बीजमाता राहीबाई पोपेरे (seedmother Rahibai Popere) यांना पद्मश्री (Padma Shri) पुरस्कार मिळाल्यानंतर दिल्लीतून थेट साई दरबारी (sai baba shirdi) येत त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावरान बीज बँकेबद्दल माहिती घेतली आणि त्यांनी बीज बँकेला भेट द्यावी, यासाठी निमंत्रण दिल्याचे पद्मश्री राहीबाईंनी साई दर्शनानंतर ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले. मोदींनी मला सिडमदर म्हणून संबोधल्याचेही त्यांनी सांगितले.

राहीबाई पोपेरे प्रथमच पोहचल्या साईबाबांच्या दरबारी
पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर बीजमाता राहीबाई पोपेरे दिल्लीतून थेट शिर्डीत साईदर्शनासाठी दाखल झाल्या. पुरस्कारानंतर प्रथमच राहीबाईंनी साईबाबांचे दर्शन घेतले. हा पुरस्कार माझ्या काळ्या मातीचा असून गावरान बीज संवर्धनाचे काम देशभर पोहचावे यासाठी साईबाबांकडे प्रार्थना केल्याचे राहीबाई म्हणाल्या. दरम्यान शिर्डीकरांनी राहीबाईंचे जल्लोषात स्वागत करत साई नामाचा जयघोष केला.

हेही वाचा -बीजमाता राहीबाई पोपेरे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते 'पद्मश्री' पुरस्काराने गौरव

Last Updated : Nov 12, 2021, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.