ETV Bharat / state

...म्हणून हिवरे बाजारातील शाळा राहणार सुरू

जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी हिवरेबाजारचे सरपंच आणि राज्य आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्याशी संपर्क केला. त्यावर हिवरे बाजारला पालक, शिक्षण अधिकारी आणि पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पालकांनी शाळा सुरूच राहिली पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली आहे.

हिवरेबाजार
हिवरेबाजार
author img

By

Published : Jun 22, 2021, 10:40 PM IST

अहमदनगर - विविध आदर्श उपक्रम राबवून केवळ राज्यातच नव्हे तर जगाच्या नकाशावर पोहचलेल्या आदर्शगाव हिवरे बाजार कोरोनामुक्त झाल्याने 15 जूनपासून माध्यमिकचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेत शाळा सुरू केली आहे. कोरोना काळात राज्यातील सर्व शाळा बंद असताना हिवरे बाजारने घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे राज्यभर कौतुक झाले. प्रसारमाध्यमांनी याकडे सकारात्मक पाहत कोरोनाची सावधानता पाळत विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याची नांदी असून कोरोनासोबत जगताना ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणात अडचणी येत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

हिवरे बाजार
शिक्षण विभागाने केली विचारणा

याबाबत शालेय शिक्षण विभागात गेल्या दोन-तीन दिवसात वेगळेच पडघम वाजल्याचे समोर येत आहे. राज्यातील इतर सर्व शाळा बंद असताना हिवरे बाजार येथिल शाळा कशी सुरू झाली याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिक्षण विभागाकडून विचारणा करण्यात आल्याची माहिती आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची जोड देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी हिवरे बाजारचे सरपंच आणि राज्य आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्याशी संपर्क केला. त्यावर हिवरे बाजारला पालक, शिक्षण अधिकारी आणि पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पालकांनी शाळा सुरूच राहिली पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली आहे.

पालकांच्या आग्रहापुढे शिक्षण विभाग नमले

उपस्थित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोरोनाचे नियम हिवरे बाजारमध्ये काटेकोरपणे पाळले जात असल्याने आणि ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणातील अडथळे मान्य करत शासनाला त्याबाबत अनुकूल अहवाल देणार असल्याचे स्पष्ट केले. राज्यात कोरोनामुक्त असलेल्या इतर गावासह हिवरे बाजार कोरोनाचे काटेकोरपणे नियम पाळत माध्यमिक अर्थात पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असल्याचे सांगितले.

हेही वाचा -कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग होणार सुरू? मुख्यमंत्र्यांचे शिक्षणविभागाला निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.