Saitirtha Theme Park Laser Show: साईतीर्थ थीम पार्क लेझर शोचं उद्घाटन; लेझर शोमुळे शिर्डीच्या लौकिकात भर - सदाशिव लोखंडे - Saitirtha Theme Park Laser Show Inauguration
Saitirtha Theme Park Laser Show : शिर्डीत मालपाणी उद्योग समूहद्वारे साई भक्तांच्या मनोरंजनासाठी लेझर शोचं (Laser Show) आयोजन करण्यात आलं होतं. मालपाणी उद्योग समूहाच्या थीम पार्क आणि वॉटर पार्क विभागाचे कामकाज बघणारे संचालक जय मालपाणी यांनी आपल्या प्रास्तविकातून लेझर शो निर्मितीमागची भूमिका सांगितली. यावेळी व्यासपीठावर उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी, आशिष मालपाणी, श्रेया मालपाणी उपस्थित होते.
Published : Nov 11, 2023, 4:57 PM IST
अहमदनगर (शिर्डी) Saitirtha Theme Park Laser Show : शिर्डीत आलेल्या साईभक्तांनी शिर्डीत थांबावे, त्यांना साई दर्शनानंतर मनोरंजनाचा उत्तम पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी साईतीर्थ थीम पार्कच्या साईभक्तांसाठी रोज निःशुल्क दाखवला जाणाऱ्या लेझर शोचं (Laser Show) उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील (Shalinitai Vikhe Patil), मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी आणि मालपाणी परिवार सदस्य उपस्थित होते.
साई भक्तांबद्दलची बांधिलकी जपली : शिर्डीकर नागरिक, विविध व्यावसायिक आणि साई भक्तांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात बोलताना शालिनीताई विखे यांनी सांगितलं की, मालपाणी परिवार नेहमीच प्रत्येक क्षेत्रात वेगळेपण जपत असतो, शिर्डीत साईभक्तांसाठी रोज निःशुल्क दाखवल्या जाणाऱ्या लेझर शोच्या माध्यमातून त्यांनी साई भक्तांबद्दलची बांधिलकी जपली आहे. तसंच मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ. संजय मालपाणी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, साईतीर्थ थीम पार्कमध्ये साईभक्तांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन तयार केलेला कार्यक्रम एक अनोखी आध्यात्मिक अनुभूती देऊन जातो, तशीच अनुभूती या नव्या लेझर शोच्या माध्यमातून मिळणार आहे. तर मनिष मालपाणी यांनी साईतीर्थ पार्कमध्ये भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली.
शिर्डीत आलेल्या साईभक्तांनी शिर्डीत थांबावे, त्यांना साई दर्शनानंतर मनोरंजनाचा उत्तम पर्याय उपलब्ध व्हावा. तसेच साईभक्तांसाठी रोज निःशुल्क दाखवला जाणारा लेझर शोचा कार्यक्रम शिर्डीच्या लौकिकात भर घालणारा ठरेल. - सदाशिव लोखंडे, खासदार
जय मालपाणी यांचा सत्कार : मालपाणी परिवाराने शिर्डीच्या पर्यटनाला पूरक ठरणाऱ्या लेझर शोची उभारणी केल्यानं, शिर्डीतल्या सर्वच व्यवसायांना मदत होणार आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिर्डीकरांच्या वतीनं शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, निमगाव कोऱ्हाळे गावाचे नवनिर्वाचित सरपंच कैलास कातोरे, शिर्डीतील हॉटेल व्यावसायिक प्रमोद गोंदकर, किशोर बोरावके आणि गफ्फार पठाण यांनी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक जय मालपाणी यांचा सत्कार केला.
हेही वाचा -