ETV Bharat / state

काल्याच्या किर्तनानंतर दहीहंडी फोडून साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाची सांगता - saibaba death anniversary kala's kirtan shirdi

सकाळी १०.०० वाजता मंदिर पुजारी उल्‍हास वाळुंजकर यांचे गोपाळ काल्‍याचे कीर्तन झाले. काल्‍याच्‍या किर्तनानंतर समाधी मंदिरात उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग, नाशिक संजय धिवरे यांच्‍या हस्‍ते दहीहंडी फोडण्‍यात आली. यावेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

saibaba death anniversary celebration over after kala's kirtan shirdi
काल्याच्या किर्तनानंतर दहीहंडी फोडून साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाची सांगता
author img

By

Published : Oct 17, 2021, 3:17 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - साईबाबांच्या पुण्‍यतिथी उत्‍सवाची सांगता काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली. साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने १४ ऑक्‍टोबरपासून सुरू हा उत्सव सुरू होता.

साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची सांगता

उत्‍सवाच्‍या सांगता दिनी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, त्‍यानंतर ०५.०५ वाजता साईंचे मंगल स्‍नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी ०६.०० वाजता संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत व त्‍यांचे पती संजय धिवरे, सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग, नाशिक यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात साईंची पाद्यपुजा व गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्‍यात आली.

दुपारी १२.१० वाजता साईबाबांच्या माध्‍यान्‍ह आरती

सकाळी १०.०० वाजता मंदिर पुजारी उल्‍हास वाळुंजकर यांचे गोपाळ काल्‍याचे कीर्तन झाले. काल्‍याच्‍या किर्तनानंतर समाधी मंदिरात उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग, नाशिक संजय धिवरे यांच्‍या हस्‍ते दहीहंडी फोडण्‍यात आली. यावेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्‍यानंतर दुपारी १२.१० वाजता साईबाबांच्या माध्‍यान्‍ह आरती झाली. सायंकाळी ०६.१५ वाजता साईंची धुपारती तर रात्रौ १०.३० वाजता शेजारती झाली.

हेही वाचा - राज ठाकरे यांनी भाजप सोबत जायला हवे - गुरु मॉं कांचन गिरी

४ लाखांहून अधिक देणगी प्राप्त -

साईबाबांचा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्‍यात आलेला प्रतिकात्‍मक भिक्षा झोळीत ग्रामस्‍थ व साईभक्‍तांनी भरभरुन दान दिले. यामध्‍ये गहु, तांदुळ, बाजरी, ज्‍वारी, तुरदाळ व हरभरादाळ असे सुमारे १५० पोते धान्‍यरुपाने आणि रवा, गुळ, साखर व खाद्य तेल आदींव्‍दारे ३ लाख ३८ हजार २६६/- रुपये व रोख स्‍वरुपात रुपये १ लाख २६ हजार ७०८ रुपये तर शॉल बेडशीट आदी वस्‍त्रांव्‍दारे ९९७ रुपये, अशी एकुण ४ लाख ६५ हजार ९७१ रुपये इतकी देणगी भिक्षा झोळीव्‍दारे प्राप्‍त झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.