ETV Bharat / state

Saibaba Death Anniversary : विजयादशमीला साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव 'अशा' पद्धतीने केला जाणार साजरा ; १०४ वा पुण्‍यतिथी सोहळा - साईबाबांचा १०४ वा पुण्‍यतिथी सोहळा

साईबाबा संस्थानच्या वतीने मंगळवार दिनांक ४ ऑक्‍टोबर ते शुक्रवार दिनांक ७ ऑक्‍टोबर २०२२ या कालावधीत साईबाबांचा १०४ वा पुण्‍यतिथी उत्सव साजरा करण्‍यात येणार (Saibaba Death Anniversary on Vijayadashami) आहे. साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून ५ ऑक्‍टोबर २०२२ रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार असल्‍याची माहिती, साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली (preperation for Saibaba Death Anniversary) आहे.

Saibaba death anniversary celebration
साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव
author img

By

Published : Sep 27, 2022, 11:49 AM IST

शिर्डी : साईबाबा संस्थानच्या वतीने मंगळवार दिनांक ४ ऑक्‍टोबर ते शुक्रवार दिनांक ७ ऑक्‍टोबर २०२२ या कालावधीत साईबाबांचा १०४ वा पुण्‍यतिथी उत्सव साजरा करण्‍यात येणार (Saibaba Death Anniversary on Vijayadashami) आहे. साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून ५ ऑक्‍टोबर २०२२ रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार असल्‍याची माहिती, साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली (preperation for Saibaba Death Anniversary) आहे.

विजयादशमी म्‍हणजे श्री साईबाबांची पुण्‍यतिथी - साईबाबांनी १०३ वर्षांपुर्वी दसऱ्याच्या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह (Saibaba Death Anniversary) ठेवला. त्‍या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. त्‍यानंतर आजतागायत हा पुण्‍यतिथी उत्‍सव नव्‍या उत्‍साहात साजरा केला जात आहे. ज्‍यामुळे विजयादशमी म्‍हणजे श्री साईबाबांची पुण्‍यतिथी अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. देशभरातील व जगातील साईभक्‍त हा उत्‍सव साजरा करतात. त्‍यानुसार दिनांक ४ ऑक्‍टोबर ते दिनांक ७ ऑक्‍टोबर २०२२ या काळात १०४ वा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा करण्‍यात येत असून उत्‍सवानिमित्‍त चार दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे.

प्रतिक्रिया देताना मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत

साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव कसा साजरा होणार - पुण्‍यतिथी उत्‍सवानिमित्‍त उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी मंगळवार दिनांक ०४ ऑक्‍टोबर रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती पहाटे ०५.४५ वाजता श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणुक, पहाटे ०६.०० वाजता व्‍दारकामाईत श्री साईसच्‍चरिताचे अखंड पारायण, पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती, दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिरातील स्‍टेजवर होणार आहे. सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती होईल. रात्री ७.३० ते ०९.५० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक होणार आहे. रात्री १०.०० वाजता श्रींची शेजारती होणार आहे. उत्‍सवाचा हा पहिला दिवस असल्‍यामुळे अखंड पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे (Saibaba Death Anniversary in Sai Mandir) राहील.

०५ ऑक्‍टोबर पुण्‍यतिथी उत्‍सवाचा मुख्‍य दिवस - बुधवार दिनांक ०५ ऑक्‍टोबर हा श्रींचे पुण्‍यतिथी उत्‍सवाचा मुख्‍य दिवस आहे. या दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्‍ती, श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी ०९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम तसेच सकाळी १०.३० वाजता श्रींचे समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती तर सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन कार्यक्रम, सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती होईल. रात्री ७.३० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्री ९.१५ वाजता गावातून श्रींच्‍या रथाची मिरवणूक होणार आहे. रात्री १०.०० ते पहाटे ०५.०० यावेळेत श्रींच्‍या समोर कलाकार हजेरी कार्यक्रम होईल. तर उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्‍यामुळे दिनांक ०५ ऑक्‍टोबर रोजी रात्री १०.०० वाजता होणारी शेजारती व दिनांक ०६ ऑक्‍टोबर रोजी पहाटेची ०५.१५ वाजता होणारी काकड आरती होणार (Saibaba death anniversary celebration) नाही.

उत्‍सवाचा तिसरा दिवस - उत्‍सवाच्‍या तृतिय दिवशी गुरुवार, दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी पहाटे ०५.०५ वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा होईल. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती, दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिरातील स्‍टेजवर होणार आहे. सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती होईल. रात्री ७.३० ते ०९.१५ यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होईल. रात्री ९.१५ वाजता श्रींची पालखीची (गुरुवार नित्‍याची पालखी) मिरवणूक होऊन रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होणार आहे.

उत्‍सवाची सांगता - उत्‍सवाच्‍या सांगता दिवशी शुक्रवार, दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी पहाटे ०५.१५ वाजता काकड आरती, सकाळी ०५.४५ वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा व गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १०.०० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजेच्‍या दरम्‍यान श्रींची माध्‍यान्‍ह आरती, सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्री ७.३० ते ०९.५० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्री १०.०० वाजता श्रींची शेजारती होणार असल्‍याचे श्रीमती बानायत यांनी (Shirdi Preparations for Vijayadashami festival) सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.