ETV Bharat / state

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर साईसंस्थान सतर्क, विदेशातून येणाऱ्या भाविकांवर लक्ष

जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंट ( Sai Sansthan vigilan ) ओमायक्रॉनचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत देशातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या साईबाबा संस्थाननेही खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. ( Non-resident Indians ) विशेषकरून विदेशातून येणाऱ्या भाविकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर साईसंस्थान सतर्क, विदेशातून येणाऱ्या भाविकांवर लक्ष

author img

By

Published : Dec 5, 2021, 12:09 PM IST

Updated : Dec 5, 2021, 12:59 PM IST

अहमदनगर (शिर्डी) - जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंट ओमायक्रॉनचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत देशातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या साईबाबा संस्थाननेही खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. विशेषकरून विदेशातून येणाऱ्या भाविकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया देताना पदाधिकारी

विदेशातून येणाऱ्या भाविकांना दर्शन पास काढतांनाच रोखता येणार

शिर्डी साईबाबा दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भविकाचे आधारकार्ड तपासले जात आहे. ( Sai Sansthan vigilan ) ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही त्यांचे पासपोर्ट आणि त्यावरील प्रवासाची हिस्ट्री तपासली जात आहे. ( Non-resident Indians ) ज्या देशामध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झालेला आहे. अशा देशातून येणाऱ्या भाविकांना दर्शन पास काढतांनाच रोखता येणार आहे. तशा सूचना पासेस इशुं करणाऱ्या ऑफिस आणि जनसंपर्क कार्यालयास देण्यात आल्याचे संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी सांगितल आहे. याशिवाय शिर्डीत विमानाने येणाऱ्या भाविकांची माहितीही संस्थानला देण्यात यावी अशी मागणीही संस्थानकडून करण्यात आल्याचे समजते.

अनिवासी भारतीयांची साई दर्शनासाठी हजेरी

गेल्या 7 ऑक्टोबर रोजी शिर्डी साईबाबा मंदिर भक्तांसाठी खुले झाले आहे. येथे एका दिवसात 25 हजार भाविकांना साई मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येत आहे. साई मंदिर सुरु झाल्यापासून 72 देशातून जवळपास 4 हजार अनिवासी भारतीयांनी साई दर्शनासाठी हजेरी लावली असल्याचे कळतय. मात्र, हे भाविक विदेशातून परतल्यावर लगेच शिर्डीत आले असे मात्र नाही. ( Omicron Virus Maharashtra ) तसेच, मूळ विदेशी भाविकही अद्याप आले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे काळजीचे कारण नसले तर यापुढे विदेशातून येणाऱ्या भाविकांची तपासणी अत्यावश्यक झाली आहे. त्यादृष्टीने संस्थानने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र अहमदाबादला हलवले तेव्हा भाजप झोपले होते का?, 'रोकठोख'मधून राऊतांची टीका

Last Updated : Dec 5, 2021, 12:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.