शिर्डी - गेली दोन अडीच वर्षात कोरोनामुळे धार्मिक स्थळे बंद असल्याने त्यांना येणाऱ्या दानावरही मोठा परिणाम झाला होता. मात्र आता पुन्हा दानाचा ओघ सुरु झाल्याने महाराष्ट्रातील नंबर एकवर असलेल्या शिर्डी देवस्थानला दोन महिन्यात तब्बल 61 कोटींचे दान ( 61 crore donation to Shirdi Devasthan in two months ) प्राप्त झाले आहे. तर भाविकांच्या संख्येतही कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 17 मार्च 2020 रोजी साईबाबांचे मंदिर ( Sai Baba Temple Shirdi ) कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर भाविकांनाही लॉकडाऊनमुळे शिर्डीला येण्याची मनाई असल्याने शिर्डीचे सर्व अर्थकारणच ठप्प झाले होत.
प्रतिक्रिया देताना संस्थानचे अधिकारी साईबाबांच्या मंदिराला वर्षभरात करोडो भक्त भेट देतात आणि देणगी मोठी देतात. भाविकांनी श्रध्देने अर्पण केलेल्या दानाची दर चार दिवसांनी मोजदाद होते. दानात वेळोवेळी आलेली रक्कम बँकेत भरली जाते. त्यानंतर साई संस्थानच्या दैनंदिन खर्चा बरोबरीने पगार, रुग्णालय, भोजनालय यावर खर्च केला जातो. दर महिन्याला कोट्यावधींचे दान येत असल्याने खर्चाचा मेळ बसत होता. मात्र कोरोना काळात देणगीच बंद झाल्याने होणारा खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार साई संस्थानने विविध बँकेत ठेवलेल्या एफडी पैकी जी एफडी मँच्युअर झाली आहे, ती पुन्हा न करता त्यातून भागवला गेला होता.साई संस्थानला वर्षाकाठी 350 कोटीचे दान येत होते. त्या दानाचा आकडा कोरोना काळात केवळ 107 कोटी इतका खाली आला होता. त्यामुळे साई संस्थानच्या गंगाजळीत सातत्याने होणारी वाढही थांबली होती. कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर फेब्रुवारीपासुन सर्वच निर्बंध उठविले गेल्याने गेल्या दोन वर्षापासून साई चरणी येण्याची इच्छा असलेल्या भाविकांनी शिर्डीत गर्दी करण्यास सुरुवात केली. गेल्या फेब्रुवारी शिर्डीला तब्बल 6 लाख भाविकांनी भेट देत 21 कोटींच दान दिले आहे. तर मार्च महिन्यात हा आकडा डबल झाला आहे. मार्चमध्ये तब्बल 10 लाखांच्यावर भाविकांनी शिर्डीला भेट दिली असून 40 कोटींच्यावर दान चढवल आहे. राज्यातील इतर देवस्थानतही गर्दी होत असून त्यांच्या दानाच्या तुलनेत शिर्डीच्या साई संस्थानला सहा टक्क्याने अधिक दान आल्याचे साई संस्थानच्या मुख्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितले.साई संस्थानला दोन वर्षात झालेली दानाची तुट आता भरुन निघण्यास सुरुवात झाली आहे. संस्थानला गेल्या दोन महिन्यात तब्बल 18 देशातील परकीय चलनही प्राप्त झाले आहे. साई संस्थानला येणाऱ्या दानाची आकडेवारी जरी मोठी असली तर साई संस्थानकडे असलेल्या तब्बल सात हजाराच्यावर कर्मचाऱ्यांचे पगार, प्रशासन, मंदिर खर्च, भाविकांच्या सुविधा, हॉस्पिटल, अन्नदान, निवासस्थाने त्याचबरोबर शिर्डीच्या विकासावर खर्च करते.
हेही वाचा - Maharashtra Water Scarcity : नाशिकच्या येवला तालुक्यात 7 टँकरद्वारे भागवली जाते आहे १५ गावांची तहान