ETV Bharat / state

साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय! 155 किलो सोनं आणि 6 हजार किलो चांदीपासून बनवणार गळ्यातील पदकं आणि नाणी - सोने चांदी नाणी आणि पदक

Sai Baba Temple : जगभरातील साईभक्तांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दानपेटीत भाविकांकडून जमा झालेल्या, 450 किलो सोन्यापैकी 155 किलो सोनं तसंच 6 हजार किलो चांदी वितळून पदक आणि नाणी (Sai Medals And Coins) तयार करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानच्या वतीनं घेण्यात आला आहे.

Shirdi Sai Baba Gold coins
साई संस्थान बनवणार गळ्यातील पदक आणि नाणी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 3:47 PM IST

साई संस्थान बनवणार सोने चांदीपासून पदक आणि नाणी

शिर्डी (अहमदनगर) Sai Baba Temple : देशभरातील प्रसिध्द असलेल्या मंदिरांमध्ये शिर्डीच्या साईबाबा मंदिराचं (Shirdi Saibaba Temple) नाव घेतलं जातं. देश-विदेशातून लोक शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी येतात. हे श्रध्दाळू भक्त दानपेटीत आपलं दान साईबाबांना अर्पित करतात. वर्षागणिक साई संस्थानाला मिळत असलेल्या देणग्या या कोट्यवधींच्या घरात असतात. तर यात सोने, चांदीचा देखील समावेश असतो.

संस्थानच्या तिजोरीत श्रद्धेनुसार दान : साईबाबा संस्थानच्या वतीनं साईभक्तांना सुख-सुविधा पुरवण्याबरोबरच नवनवीन प्रयोग राबवले जातात. वर्षाकाठी जगभरातील कोट्यवधी भाविक शिर्डीत येत असतात. साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन संस्थानच्या तिजोरीत श्रद्धेनुसार रोख स्वरूपात तर कधी सोने, चांदीचे भरभरून दान टाकतात. आज साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेकडे अंदाजे 450 किलो सोने तर 6 टन (6 हजार किलो) चांदी (Gold And silver) उपलब्ध आहे. तुळजापूर येथील संस्थान देखील सोने चांदी वितळून भाविकांसाठी नाणी आणि पदक (Sai Medals And Coins) बनविण्याच्या विचाराधीन असल्याचं समजतंय. त्या पार्श्वभूमीवर तुळजापूर संस्थानच्या एका पथकाने शिर्डीत साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांची भेट घेतलीय.

साईबाबांचे पदक बनविण्यात येणार : याबाबत साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की, साईबाबा संस्थान देखील 155 किलो सोने तसंच 6 हजार किलो चांदी वितळवून त्यापासून नाणी, पदकं बनवणार आहे. यामध्ये सोन्याची 5 ग्रॅम तसंच 10 ग्रॅम वजनाची साईबाबांची पदकं बनविण्यात येणार आहेत. तसंच 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅम वजनाची नाणी देखील बनविणार येणार आहेत. अनेक दिवसांपासून असलेली भाविकांची मागणी आता कुठं पूर्णत्वास येताना दिसून येत आहे. साईबाबा संस्थानच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळं जगभरातील साईभक्तांसाठी ही खुशखबर असणार आहे.

शासनाकडे मागितली परवानगी : भाविकांनी आजपर्यंत साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात 450 किलो सोनं आणि 6 हजार किलो चांदी दिले आहे. यातील 155 किलो सोने आणि 6 हजार किलो चांदी वितळून त्यापासून गळ्यातील पदकं आणि नाणी तयार करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी, साई संस्थानने शासनाकडे केलीय. शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर हे सोने आणि चांदी वितळून त्यापासून गळ्यातील पदकं आणि नाणी तयार करण्यात येणार असल्याचं, साई संस्थानच्या वतीनं सांगण्यात आलंय.

हेही वाचा -

  1. सुप्रिया सुळे साई चरणी; काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुणालाही विचारा राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? - सुळे
  2. साईबाबा संस्थानला एक कोटी रुपयांची इमारत देणगी; बंगळुरूच्या महिलेनं केलं पतीचं स्वप्न पूर्ण
  3. सहा देशातील भाविक झाले साईचरणी नतमस्तक; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.