ETV Bharat / state

Sai Devotees At Sai Mandir : सरत्या वर्षाला निरोप ; नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो साईभक्तांची साई दरबारात हजेरी

शिर्डीत नविन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात (Sai Devotees At Sai Mandir) आले. काल रात्री 12 वाजता भाविकांनी साईनामाचा जयघोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली. तसेच मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली (Sai Devotees welcome new year) होती.

Sai Devotees At Sai Mandir
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो साईभक्तांची साई दरबारात हजेरी
author img

By

Published : Jan 1, 2023, 8:26 AM IST

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो साईभक्तांची साई दरबारात हजेरी

अहमदनगर : सरत्या वर्षाला निरोप देताना नववर्षांच स्वागत मंगलमय वातावरणात करण्यासाठी लाखो साईभक्तांनी साई दरबारात हजेरी लावली. रात्री 12 वाजेच्या सुमारास भाविकांनी साईंची द्वारकामाई तसेच मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली (Sai Devotees At Sai Mandir) होती. नविन वर्ष साईंच्या सानिध्यात घालवताना भजन-किर्तनात साईभक्त तल्लीन होताना दिसले. बालगोपाळ, वृद्ध आणि तरूणाई अशा सर्वच वयोगटातील भाविकांची मांदियाळी साईदर्शनासाठी दिसुन आली. बरोबर रात्री 12 वाजता साईंच दर्शन घ्यावे, या उद्देशाने भाविकांनी दर्शनबारीत प्रवेश केल्याचे प्रकषाने जाणवले. ज्यांना मंदिरात प्रवेश करता आला नाही, त्यांनी मुखदर्शन आणि साई समाधी मंदिराच्या कळसाच दर्शन घेत धन्यता मानली. मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुल ठेवल्याने लाखो भाविकांना रात्रीतून दर्शन घेता आले (Sai Devotees welcome new year) आहे.

स्वागत मोठ्या जल्लोषात : साईनगरीत नविन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. तासनतास रांगेत उभ राहात भाविकांनी नविन वर्षात सुख - शांती आणि स्वास्थ्यासाठी साईबाबांना साकड घातले. स्वत: आणि कुटूंबाबरोबर देश बांधवांसाठीही भाविकांनी प्रार्थना केली. साईबाबा संस्थाननही नविन वर्षाच स्वागत करताना साईसमाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरूस्थान मंदिराला आकर्षक फुलांनी (Sai Mandir Shirdi) सजवले.

सरत्या वर्षाला निरोप : मंदिराला आकर्षक विद्यूत रोषणाईही करण्यात (Sai Devotees welcome new year ) आली. रात्री 12 वाजता भाविकांनी साईनामाचा जयघोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. मिठाई वाटून सरत्या वर्षाला निरोप आणि नविन वर्षाच स्वागत करत भाविकांनी एकमेकांना आलींगन देत शुभेच्छा दिल्या. नवीन वर्षाच्या स्वगतासाठी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलेल्या प्रत्येक भाविकाला बाबांचे दर्शन मिळावे, यासाठी साई संस्थानच्या वतीने रात्रभर साई मंदिर खुले ठेवण्यात आले (Sai Mandir auspicious atmosphere) आहे.

साईचरणी वर्षभरात चारशे कोटींचे दान : १ जानेवारी ते २६ डिसेंबर दरम्यान संस्थानला सर्व प्रकारे एकुण ३९४ कोटी २८ लाख ३६ हजार देणगी मिळाली आहे. ३१ डिसेंबर पर्यंतच्या देणगीसह हा आकडा चारशे कोटींचा विक्रमी टप्पा पार करण्याची चिन्हे आहेत. २६ डिसेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या देणगीचा तपशील-दक्षिणा पेटी- १६५ कोटी ५५ लाख, देणगी कांऊटर- ७२ कोटी २६ लाख २७, डेबीट व क्रेडीट कार्ड-४० कोटी ७४ लाख, ऑनलाईन देणगी- ८१ कोटी ७९ लाख, चेक व डीडी- १८ कोटी, ६५ लाख व मनीऑर्डर- १ कोटी ८८ लाख रुपये. याशिवाय सोने- २५ किलो ५७८ ग्रॅम (११ कोटी ८७ लाख), चांदी- ३२६ किलो ३८ ग्रॅम (१ कोटी ५१ लाख). साईसंस्थानचे विदेशी चलन खात्याचा परवाना रिन्युएशन करणे प्रलंबीत असल्याने कोट्यावधी रुपयांचे विदेशी चलन पडून आहे. दरवर्षी या माध्यमातुनही पंधरा ते वीस कोटी रुपयांची देणगी मिळत असते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.