ETV Bharat / state

अहमदनगर-मनमाड महामार्गावर वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद, एलसीबीची कारवाई

अहमदनगर-मनमाड महामार्गावर गाड्या लुटणाऱ्या टोळीला एलसीबी पोलिसांना जेरबंद केले आहे.

ahmednagar crime
अहमदनगर; महामार्गावर लुटणारी टोळी जेरबंद, एलसीबीची कारवाईcrime
author img

By

Published : May 25, 2020, 1:06 PM IST

Updated : May 25, 2020, 1:23 PM IST

अहमदनगर - नगर-मनमाड महामार्गावर वाहनचालकांना अडवून मारहाण करून लुटणारे सराईत चोरट्यांची टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींनी लोणी व कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत दाखल गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली १ लाख २० हजार रुपयांच्या दोन बिनानंबरच्या पल्सर दुचाकी, ३० हजार रुपयाची बिनानंबरची स्पेलडर, २ हजार रुपयांची एअर गण असा १ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अहमदनगर-मनमाड महामार्गावर वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद, एलसीबीची कारवाई

पकडण्यात आलेल्यामध्ये आरीफ गफूर शेख (वय २५, रा.अवघड पिंप्री ता.राहुरी), सागर गोरख मांजरे (वय २४, रा.मातापूर ता.श्रीरामपूर ह.रा.शिवाजीनगर कल्याण रोड, अहमदनगर), अविनाश श्रीधर साळवे (वय २२, राहुरी काँलेजच्या पाठीमागे, राहुरी), सुखदेव गोरख मोरे (वय २३, रा. पिंपळवाडीरोड, राहाता), चेतन राजेंद्र सणासे (वय १९, रा.पिंपळवाडी रोड, राहाता), अक्षय सुदाम माळी (वय २२, रा.खंडोबा चौक, राहाता), अक्षय सुरेश कुलथे (वय २०, रा.इंगळे ईस्टेट, मल्हारवाडीरोड, राहुरी), सागर पोपट हरिश्चंद्र (वय २२, रा.धोमारी खुर्द, राहुरी) यांच्याबरोबर एक अल्पवयीन मुलगा आहे. वरील सर्व आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.

सर्व आरोपी रात्री राहुरी येथे एकत्र येत होते. यानंतर तीन दुचाकीवरून पिंपळवाडीरोड (ता.राहाता) येथे सुखदेव मोरे यांच्या घरी व शेतात मुक्कामी थांबत होते. पहाटे ३ वाजल्यानंतर तिन्ही दुचाकीवरून नगर-मनमाड महामार्गावर येऊन एकट्या जाणाऱ्या वाहनचालकांची रेकी करून त्याचा पाठलाग करत असत.

यानंतर दोन्ही दुचाकीवरील सहाजणांनी वाहन अडवून चालकाला चाकू, लोंखडी कत्ती आणि एअर गणचा धाक दाखवून मारहाण करून लुटले जात होते. तर, एक दुचाकीवरील तिघांनी वाहन अडवल्यानंतर समोरुन व पाठीमागून येणाऱ्या वाहनांवर व पोलिसांच्या गाडीवर लक्ष ठेवले जात होते. लुटमार करणाऱ्या साथीदारांना सावध करणे, गुन्ह्याची माहिती तात्काळ कुणाला सांगू नये, यासाठी चालकांचा मोबाईल काढून तो फोडून फेकून दिला जात असे. या आरोपींमध्ये अविनाश साळवे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात ६ तर एमआयडीसी पोलीस ठाण्यात १ असे गुन्हे दाखल आहेत. सागर मांजरे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात १०, एमआयडीसी, राहुरी, श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरिफ शेखवर राहुरी, एमआयडीसी, सोनई पोलीस ठाण्यात, अक्षय माळी यांच्यावर संगमनेर पोलीस ठाण्यात, अक्षय कुलथे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात तर सागर हरिश्चंद्र यांच्या वर हडपसर, दिधी (पुणे), नगर तालुका, राहुरी व सोनई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Last Updated : May 25, 2020, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.