ETV Bharat / state

मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदीदारांना फायदा - महसूलमंत्री - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात कपातीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा चांगला फायदा झाला असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Revenue Minister Balasaheb Thorat
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Jan 2, 2021, 7:06 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा चांगला फायदा झाला असून बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करणाऱ्यांनाही मोठा फायदा झाला आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

दस्तनोंदणीत ४८ टक्क्यांनी वाढ -

मुद्रांक शुल्कात सरसकट 3 टक्के सवलत दिली गेली. या सवलतीमुळे घर खरेदीस चालना मिळून बांधकाम क्षेत्रालाही संजीवनी मिळाली आणि राज्याच्या तिजोरीतही महसूल जमा झाला. महसूल विभागाने राबाविलेलेल्या या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत 2019 च्या तुलनेत दस्तनोंदणीत 48 टक्के तर राज्याच्या महसुलात 367 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेने व उद्योगक्षेत्राने गती पकडली असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.

बांधकाम क्षेत्रातील मरगळ झटकून अर्थव्यस्थेला चालना -

यशोधन कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ.डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे उपस्थित होते. थोरात म्हणाले की, बांधकाम क्षेत्रात आलेले मंदीचे सावट दूर करुन या क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच घर खरेदी करणारे या दोघांचे हित लक्षात घेऊन मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन मरगळलेल्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली. राज्य सरकारच्या या निर्णयाचे केंद्र सरकारनेही कौतुक केले असून इतर राज्य सरकारांनीही महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्याच्या महसुलात वाढ -

डिसेंबर 2019 मध्ये 2 लाख 39 हजार 292 दस्त नोंदणीसह 2 हजार 712 कोटींचा असलेला महसूल डिसेंबर 2020 मध्ये तब्बल 4 लाख 59607 दस्त नोंदणी होऊन 4 हजार 314 कोटींचा महसूल प्राप्त झाला. डिसेंबरमधील दस्त नोंदणीत तब्बल 92 टक्के वाढ तर महसुलात 59 टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात 2019 साली 8 लाख 44 हजार 636 दस्त नोंदणी होऊन महसूल 9 हजार 254 कोटी रुपये मिळाला होता. तर 2020 मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात 12 लाख 56 हजार 224 दस्त नोंदणी झाली आणि 9 हजार 622 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. या चार महिन्यात दस्त नोंदणीत 48 टक्के वाढ तर महसुलात 3.97 टक्के वाढ झाली.

घर खरेदी करणाऱ्यांचे स्वप्न झाले पूर्ण -

महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला दिलेल्या बुस्टर डोसमुळे या क्षेत्रातील मरगळ जाऊन पुन्हा या क्षेत्रात मोठी उलाढाल झाली आहे. मुंबई, पुणे या मोठ्या शहराबरोबरच इतर शहरी भागातही घर खरेदी करणार्‍यांचे स्वप्न यामुळे पूर्ण झाले. विशेषत: मोठ्या शहरात फ्लॅट खेरदीच्या किंमतीमुळे मुद्रांक शुल्क लाखात भरावा लागत होता. त्यात घट केल्याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही खीळ बसली होती. महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात मोठी कपात केल्याने तिजोरीत पैसा येण्यास मदत झाली व ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक या दोघांचाही फायदा झाला, असे महसूलमंत्री थोरात म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.