ETV Bharat / state

अभिनेत्री कंगनाची स्वातंत्र चळवळीवर बोलण्याची लायकी आहे का? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात....

कंगनाची स्वातंत्र चळवळीवर बोलण्याची लायकी आहे का? अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अभिनेत्री कंगना रणौतवर टीका केली. (Balasaheb Thorat criticize kangana ranaut) भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले', अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रणौतने उधळली आहेत. यानतंर तिच्यावर अनेकांनी टीका केली.

Revenue Minister Balasaheb Thorat
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Nov 20, 2021, 8:52 PM IST

अहमदनगर - अनेकांच्या बलिदानानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. महात्मा गांधीजींचा सत्याग्राहाचा विचार होता. त्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. आजही महात्मा गांधीच्या विचारवरच देशभरात चळवळी होतात. त्यामुळे कंगनाची स्वातंत्र चळवळीवर बोलण्याची लायकी आहे का? अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अभिनेत्री कंगना रणौतवर टीका केली. (Balasaheb Thorat criticize kangana ranaut) भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले', अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रणौतने उधळली आहेत. यानतंर तिच्यावर अनेकांनी टीका केली.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात याबाबत बोलताना

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

अभिनेत्री कंगनाने काही व्यक्तव्य केले की लगेच तिला संरक्षण मिळते. लगेच पद्मश्री मिळतो. कंगनानंतर आणखी अभिनेते विक्रम गोखले बोलले. त्यांनाही पद्मश्री व्हायचे दिसुन येत आहे. या सगळ्यांच्या बोलण्यामागे एक मेंदु आहे. आज स्वातंत्र्यावर बोलले. उद्या राज्यघटनेवर बोलतील, हे लक्षात घेतले पाहिजे. उद्या हेच लोक राज्यघटनाही बोगस ठरवतील. ज्यावेळी ते राज्य घटनेवर येऊन पोहोचले. त्यावेळी आपण आतापर्यंत जे कमावले ते संपल्याशिवाय राहणार नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे, असे मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या शेतकरी विजय दिवस (farmers victory day) कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब थोरात बोलत होते.

हा शेतकऱ्यांच्या लढ्याचा विजय -

आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा गेल्या एक वर्षापासून ऊन, पाऊस आणि रक्त गोठवणार्‍या थंडीत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या देशभरातील शेतकर्‍यांच्या लढ्याचा मोठा विजय आहे. मात्र, आंदोलना दरम्यान शेतकर्‍यांवर केलेल्या अत्याचाराची जबाबदारी भाजप सरकारला टाळता येणार नाही. त्यांनी प्रायश्चित घेऊन माफी मागावी, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने या शेतकरी आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. शेतकर्‍यांना खलिस्तानी, नक्षलवादी, देशद्रोही म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. रक्त गोठवणार्‍या थंडीत शेतकर्‍यांवर पाण्याचा मारा केला, रस्त्यावर खिळे ठोकून त्यांना अडविले गेले. शेकडो शेतकर्‍यांचा मृत्यू या आंदोलनादरम्यान झाला. काही शेतकरी बांधवांना गाडीखाली चिरडून मारले गेले. त्याची जबाबदारी मोदी सरकारला टाळता येणार नाही आणि अन्नदात्याची माफी मागावी लागेल. मोदी सरकार हे 'हम दो हमारे दो'साठीचे सरकार आहे. तीन कृषी कायद्याच्या आडून शेतकर्‍यांना संपवण्याचे काम होणार होते. शेतकर्‍यांनी निर्धाराने लढा देऊन कितीही मोठ्या अहंकारी शासनाला झुकवू शकतो हे दाखवून दिले, असेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.