ETV Bharat / state

Religious Disputes Rahuri: राहुरीत विशिष्ट समुदायाकडून पुजाऱ्यासह भाविकांना मारहाण; गावात तणावाचं वातावरण - विशिष्ट समुदायाकडून पुजाऱ्याला मारहाण

Religious Disputes Rahuri : अहमदनगर जिल्ह्यातील गुहा येथील कानिफनाथ देवस्थानाचा वाद पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. (beating of priest by certain community) आज (सोमवारी) अमावस्या असल्याने येथे कानिफनाथ महाराजांची पूजा करण्यासाठी भाविक आणि पुजाऱ्यांंनी मंदिरात प्रवेश केला. (Kanifnath temple dispute Guha) दरम्यान एका विशिष्ट समुदायातील स्त्री, पुरुषांनी भाविकांसह पुजाऱ्याला जबर मारहाण केली.

Religious Disputes Rahuri
धार्मिक वाद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 6:22 PM IST

गुहा गावातील दोन गटातील तणावावर पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

अहमदनगर Religious Disputes Rahuri : जिल्ह्यातील गुहा येथील कानिफनाथ देवस्थानाचा वाद आता पुन्हा उफाळून आला आहे. आज (सोमवारी) अमावस्येनिमित्त सुरू असलेल्या पूजा आणि धार्मिक कार्यक्रमात एका समाजाच्या पुरुष तसंच महिलांच्या जमावानं मंदिरात शिरून पूजारी आणि भाविकांना मारहाण केली. यामुळे गुहा गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. (dispute over worship)

तोडगा काढण्याचा प्रयत्न निष्फळ : राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ देवस्थानावरून दोन समाजात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. याबाबत न्यायालयात खटला दाखल आहे. प्रशासनानं दोन्ही समाजाच्या ज्येष्ठ लोकांच्या अनेक वेळा बैठका घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्नही केले. यावर दोन्ही समाजाला मान्य होतील असा तात्पुरता तोडगा देखील काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्यापही तोडगा निघालेला नसल्यानं हा वाद वारंवार उफाळून येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

'ते' अनधिकृत धार्मिक स्थान सिल करा : 13 नोव्हेंबर रोजी सकाळी अमावस्येनिमित्त पूजा करण्यासाठी गेलेल्या पुजाऱ्याला आणि भाविकांना दुसऱ्या समाजातील लोकांनी महिलांना बरोबर घेऊन धार्मिक ठिकाणी जाऊन जबर मारहाण केली. या घटनेमुळं गावात दोन समाजात चांगलाच तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला समजताच मोठा फौजफाटा गुहा गावात तैनात करण्यात आला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून मंदिराशेजारी असलेलं अनाधिकृत धार्मिक स्थान सील करण्याची मागणीही यावेळी एका गटाकडून करण्यात आली आहे. दोन्ही गटांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

भोंग्यावरून होणारा वाद शमला : राज्यात एकेकाळी भोंग्यावरून राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. पण एक गाव असंही आहे की, ज्या गावात भोंगेच नाहीत. नांदेड जिल्ह्यातील हे आहे बारड (ता.मुदखेड) गाव. या गावात कुठल्याच धार्मिक स्थळावर भोंगे दिसणार नाहीत. 30 जानेवारी 2017 मध्ये बारड ग्रामपंचायतीनं गावात भोंगे बंदीचा ठराव घेतला. या ठरावाला सर्वच जाती धर्माच्या लोकांनी होकार दिला. गत 5 वर्षांपासून बारड या गावात भोंग्याचा आवाज कधी वाजलाच नाही. तेव्हापासून येथे कुठल्याही धार्मिक गटात वाद झालेला नाही.

२०१७ मध्ये झाला एकमताने निर्णय : मुदखेड तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून बारड या गावाची ओळख आहे. गावाची लोकसंख्या 10 हजार असून, गावात सर्वच जाती -धर्माचे लोक राहतात. पण भोंग्याच्या आवाजावरून या गावात देखील पूर्वी वाद व्हायचा. पण 2017 मध्ये गावकऱ्यांनी एकत्र येत ठराव घेऊन हा होणारा वाद कायमचा थांबवण्यासाठी भोंगेबंदीचा निर्णय घेतला.

किरकोळ वादविवाद थांबले : भोंग्याच्या आवाजाच्या किरकोळ कारणावरून होणारे वादविवाद देखील होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान गावात हिंदू धर्माचे एकूण मंदिरे 8 आहेत. तर मशीद 1 आहे. बौद्ध धर्मियांची श्रध्दास्थळे म्हणजेच बौद्ध विहार 2 आहेत. जैन मंदिर 1 आहे. या सर्वच धार्मिक स्थळावर भोंगे नाहीत. धार्मिक स्थळांसोबतच गावात धार्मिक कार्यक्रम, राजकीय, सांस्कृतिक, आशा कार्यक्रमात देखील भोंगे लावण्यास बंदी आहे. सध्या राज्यात भोंग्यावरून राजकीय वातावरण चांगलाच तापलं असलं तरी, नांदेड जिल्ह्यातील बारड या गावाचा आदर्श घेतल्यास भोंग्यावरून होणारा वाद नक्कीच थांबेल, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

हेही वाचा:

  1. Satara Riots Investigation: सातारा दंगली प्रकरणी तपास 'एनआयए'कडे द्यावा; मानवाधिकार परिषदेची मागणी
  2. Shambhuraje Desai Visited Pusesavali: दंगलीनंतर दहा दिवसांनी साताऱ्याच्या पालकमंत्र्यांची पुसेसावळीला भेट, पीडिताच्या कुटुंबानं 'ही' केली मागणी
  3. Riots in Satara : सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टच्या वादातून साताऱ्यात दंगल; एकाचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.