अहमदनगर - राज्यामध्ये नुकतीच 5200 पोलीसांची भरती प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. त्यानंतर आता 7200 पोलिसांची मेगा भरती होणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ( Maharashtra Police Recruitment ) दिली. ते अहमदनगर मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
5200 पोलीस लवकरच सेवेत रुजू
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "राज्यातील 5200 पोलिसांची भरती प्रक्रिया पुर्ण होत आलेली आहे. त्यांचे लेखी आणि शारीरिक चाचण्या झाल्या असून, यातील निवड कर्मचारी लवकरच कामावर रुजू होतील. तसेच, आता नव्याने 7200 पोलीस पदे भरली जाणार ( Dilip Walase Patil On Police Recruitment ) आहेत. यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी भेटली असून, लवकरच मेगा भरती प्रकिया राबवली जाणार आहे," अशी माहितीही त्यांनी दिली.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या ई टपाल सेवेचा नगरमध्ये सुभारंभ करण्यात आला. त्याबाबत बोलाताना त्यांनी सांगितले की, राज्यात प्रथमच अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ई-टपाल सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक तक्रारदारांचे अर्जाचा निपटारा तातडीने होऊन याची अपडेट माहिती ही पोलीस अधीक्षक यांना मोबाईल च्या एका क्लिकवर असणार आहे. ही ई-टपाल सेवा एक पथदर्शी उपक्रम असून त्याचा अभ्यास करून तो राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयात राबवण्याचा मानस, पाटील यांनी बोलून दाखवला.
हेही वाचा - Sushant Singh Rajput case : एनसीबीची मोठी कारवाई, सुशांत सिंह राजपूतच्या शेजाऱ्याला केली अटक