ETV Bharat / state

दहावीतील बालिकेवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्यानं खळबळ - अल्पवयीन बालिकेवर अत्याचार

Rape On Minor Girl : दहावीत शिकणाऱ्या बालिकेवर अल्पवयीन नराधमानं बलात्कार केल्यानं पीडिता गरोदर राहिली. त्यामुळं श्रीरामपुरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नराधमाच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर मुख्य आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बलात्कार
बलात्कार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2023, 2:41 PM IST

Updated : Dec 23, 2023, 7:01 AM IST

अहमदनगर Rape On Minor Girl : एका दहावीतील बालिकेवर अल्पवयीन नराधमानं अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली. या बालिकेची प्रकृती बिघडल्यानं तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या बालिकेवर मागील सात महिन्यांपासून हा नराधम अत्याचार करत होता. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाला मदत करणाऱ्या साथीदाराला ताब्यात घेतलं. तर मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिली आहे.

गुरुवारी पीडितेनं दिलेल्या तक्रारीवरुन बलात्कार करणारा अल्पवयीन आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्या आरोपीविरुद्ध भादंवि कलम 376 (2) (एन) 366 बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या ( POCSO ) कलम 4, 6, 8, 12 प्रमाणं श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आलं असून एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून आरोपीला लवकरच गजाआड करण्यात येईल - हर्षवर्धन गवळी, पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे

प्रकृती बिघडल्यानं उघडकीस आली घटना : श्रीरामपूर शहरात राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेला धमकावून तिच्यावर वेळोवेळी बळजबरीनं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. ही बालिका दहावीमध्ये शिकत असून तिची प्रकृती बिघडल्यानं तिला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नराधमाचा साथीदार ताब्यात : अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करण्यासाठी आरोपीला 20 वर्षीय साथीदारानं या गुन्ह्यात मदत केली. तो अल्पवयीन बालिकेला दुचाकीवर बसवून अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन नराधमाकडं नेऊन सोडायचा. या सततच्या अत्याचारामुळं बालिका गर्भवती झाली. तिच्या लहानपणाचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेत हा लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

बलात्कार करणाऱ्या नराधमांच्या विरोधात गुन्हा : या अत्याचाराच्या घटनेनं बालिकेसह तिच्या घरच्यांना धक्का बसला आहे. गुरुवारी पीडितेनं दिलेल्या तक्रारीवरुन बलात्कार करणारा अल्पवयीन आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्या आरोपीविरुद्ध भादंवि कलम 376 (2) ( एन) 366 बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायद्याच्या ( POCSO ) कलम 4, 6, 8, 12 प्रमाणं श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आलं असून एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून आरोपीला लवकरच गजाआड करण्यात येईल, असं श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सांगितलं आहे. पीडित मुलीला पुढील उपचारासाठी अहमदनगर इथल्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. 16 वर्षाचा भाचा मामाकडं आला राहायला; मामीनं केला लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
  2. विकृतीचा कळस! 64 वर्षीय महिलेवर बलात्कार करुन विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून; ट्रॉम्बे पोलिसांनी आरोपीला केली अटक
  3. वैजापूर तालुक्यात दारूच्या नशेत युवकाचा ८५ वर्षीय आजीवर बलात्कार करुन खून

Last Updated : Dec 23, 2023, 7:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.