अहमदनगर : नगरमध्ये (Ahmednagar) माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील तारकपूर परिसरात एका 74 वर्षीय वृद्ध महिलेस मारहाण करून तिच्यावर बलात्कार (rape on 74-year-old woman) केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
अंधाराचा फायदा घेत केले दुष्कृत्य -
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर शहरातील तारकपूर परिसरात हि धक्कादायक घटना घडली. आरोपीने पीडित महिला घरात एकटी असताना घरात घुसून हे दुष्कृत्य केले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी घरात घुसला. त्यानंतर त्याने पीडितेला मारहाण केली आणि तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करून आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले.
आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात -
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पीडित महिलेचा जबाब नोंदवून तक्रार दाखल करून घेतली आहे. दरम्यान, पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू असून पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सदर प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - बलात्काराच्या 'या' घटनांमुळे हादरला होता महाराष्ट्र