ETV Bharat / state

मराठी साहित्याची परंपरा ही प्राचीन नसून बहुआयामी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी - Narendra Modi On Marathi Language - NARENDRA MODI ON MARATHI LANGUAGE

केंद्र सरकारनं गुरूवारी मराठी भाषेला 'अभिजात' भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी यांना मुंबईत महाराष्ट्र सरकारतर्फे गौरविण्यात आलं.

PM Narendra Modi On Marathi Language
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Twitter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2024, 10:46 PM IST

मुंबई : राज्यातील विविध विकासकामांचं भूमिपूजन, उद्घाटन सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर होते. दोनच दिवसापूर्वी केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. या कारणाने पंतप्रधानांच्या या दौऱ्यात सायंकाळी उशिरा मुंबईतील बीकेसीमधील सभागृहात महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांना गौरविण्यात आलं. याप्रसंगी मराठी साहित्य, चित्रपट, केला क्षेत्रातील तमाम मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेचं भरभरून कौतुक केलं. याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात त्यांचाही सहभाग असल्यानं ते स्वतःला धन्य समजत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

"मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटल्याबद्दल महाराष्ट्रातील, महाराष्ट्र बाहेरील आणि सर्व जगातील मराठी भाषिकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला हा मराठी भाषेसाठी गौरवाचा दिवस आहे. हे करण्यासाठी यात माझे सहकार्य लाभले हे माझ्यासाठी फार मोठे कार्य आहे. भारतीय स्वतंत्र इतिहास हा मराठी भाषेच्या योगदानाने समृद्ध होतो". - नरेंद्र मोदी , पंतप्रधान

मराठी भाषेविषयी भरपूर आवड आणि प्रेम : मोदी पुढे म्हणाले की, पहिल्यांदा असं सरकार देशात आहे. जे मातृभाषेमध्ये अभ्यास करणाऱ्याला महत्त्व देते. नवीन एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत मराठीमध्ये मेडिकल आणि इंजिनिअरचा अभ्यास केला जातो. मराठी भाषा जगभरात पोहचली पाहिजे. मराठी भाषेला हा गौरव देण्यासाठी साहित्यकार, कवी, लेखक यांनी प्रचंड प्रवास केला. मराठी साहित्याची परंपरा ही प्राचीन नसून बहुआयामी आहे. मला दोन ते तीन मराठी पुस्तकांचं गुजरातीत अनुवादन करण्याचं सौभाग्य भेटलं. मागील ४० वर्षापासून माझा संपर्क तुटला आहे. परंतु आता सुद्धा मला जास्त असुविधा होत नाही. अहमदाबादमध्ये भिडे नावाचा मराठी परिवार राहायचा. शुक्रवारी त्यांना सुट्टी असायची मी त्यांच्या घरी जायचो. त्यांची छोटी मुलगी होती, ती मला मराठी शिकवायची. असं सांगत मोदी यांनी मराठी भाषेविषयी त्यांना असलेली आवड आणि प्रेम व्यक्त केलं.

जणू काही माझ्या आईचा सन्मान : या सोहळ्याला मराठी साहित्य, कला, चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना सुपर सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, सचिन पिळगावकर म्हणाले की, "ज्या भाषेत माझं बारंस झालं. ज्या भाषेत मी बोबड्याने बोलायला लागलो. जी भाषा मला आईने शिकवली म्हणून ती माझी मातृभाषा झाली. या भाषेला इतका मोठा दर्जा भेटतो म्हणजे जणू काही माझ्या आईचा सन्मान केल्यासारखा झाला. माझ्या आईला तुम्ही इतकं मोठं मानलं. या इच्छेला केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं मान्यता दिली. म्हणून मी माझ्या आईच्यावतीनं तुमचे आभार मानतो. मातृभाषेला जपणं सुद्धा तितकच महत्त्वाचं आहे, जितका तिला दर्जा देणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक मातृभाषा महत्त्वाची आहे. परंतु त्या मातृभाषेवर तेवढं प्रेम सुद्धा करता आलं पाहिजे, जितकं प्रेम आपण आपल्या आईवर करतो. आता या भाषेबद्दल जो काही न्यूनगंड आहे तो सुद्धा कमी होत जाईल".

तर मी दोन वेळेला जेवली असती : सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले म्हणाल्या की, या भाषेला घडविण्यासाठी ज्यांनी युद्ध दिलं त्या सर्व महान साहित्यिक, अभिलेखक, विद्वान त्यांना आज आपण सन्मान देत आहोत. तुमच्या अथक परिश्रमामुळं मराठी भाषेने अभिजा भाषेचा गौरव मिळवला आहे. या भाषेचा सन्मान करत तिचा विकास आणि प्रचार करण्याचं काम आपण सन्मानानं केलं पाहिजं. तसेच सरकारच्या महत्वकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची आशा भोसले यांनी प्रशंसा केली आहे. त्या म्हणाल्या की, "लाडक्या बहिणींना जे १५०० रुपये तुम्ही दिले आहेत, त्यामुळं त्यांची व्यथा आणि खुशी ही माझ्याशिवाय इतर कुणाला कळणार नाही. हे काम जर १९४७ साली कोणी केलं असतं तर मी दोन वेळेला जेवली असती. त्यावेळी सकाळचं जेवण मी संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं. म्हणून मला वाटतं हे १५०० रुपये हे ज्यांच्याकडं पैसे नाहीत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देते. कारण मी या परिस्थिती मधून गेली आहे.

हेही वाचा -

  1. "उद्धव ठाकरे यांच्या हट्टापायी..."; पंतप्रधान मोदींची बोचरी टीका - Narendra Modi On Uddhav Thackeray
  2. महायुतीत पडणार खिंडार! अमरावती मतदार संघावर भाजपाचा दावा - Maharashtra Assembly Election 2024
  3. पंतप्रधान मोदींकडून नंगारा भवनाचं उद्घाटन, बंजारा समाजाच्या 'काशी'त वाजवले नगारे - PM NARENDRA MODI SPEECH IN WASHIM

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.