ETV Bharat / bharat

भाजपाला मोठा धक्का; हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार येणार, 'एक्झिट पोल'चे आकडे आले समोर - Haryana Exit Poll Result

हरियाणा विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल निकाल समोर आले आहेत. विविध एक्झिट पोलनुसार हरियाणात काँग्रेसला मोठे यश मिळत असल्याचं दिसत आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

HARYANA EXIT POLL RESULT
हरियाणा विधानसभा निवडणुक एक्झिट पोल निकाल (Source - ETV Bharat)

चंदीगड : हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान पार पडलंय. आता 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर होतील. दरम्यान हरियाणामधील विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहे. एक्झिट पोलच्या निकालानूसार, हरियाणात 10 वर्षांनंतर काँग्रेसचं पुनरागमन होण्याची चिन्हं आहेत. तर भाजपाच्या हातून सत्ता निसटण्याची शक्यता आहे.

'ध्रुव रिसर्च'चा एक्झिट पोल : ध्रुव रिसर्च'च्या एक्झिट पोलनुसार, 10 वर्षांनंतर हरियाणात काँग्रेसचं सरकार येणार असल्याचं दिसून आलं. काँग्रेसला 57 जागा मिळताना दिसत आहेत. भाजपला 27 तर इतरांना 6 जागा मिळताना दिसत आहेत.

'पीपल्स पल्स'चा एक्झिट पोल : 'पीपल्स पल्स'च्या एक्झिट पोलनुसार, हरियाणामध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, हरियाणात काँग्रेसला 49 ते 61 जागा मिळतील, तर भाजपला 20 ते 32 जागा मिळतील, INLD-BSP 2 ते 3, AAPला 0 आणि इतरांना 3 जागा मिळतील.

'रिपब्लिक इंडिया'चा एक्झिट पोल : 'रिपब्लिक इंडिया'च्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला 18 ते 24, काँग्रेसला 55 ते 62, जेजेपी आघाडीला 3, INLD आघाडीला 3 ते 6 आणि इतरांना 2ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे.

'टाईम्स ऑफ इंडिया'चा एक्झिट पोल : 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या एक्झिट पोलनुसार, काँग्रेसला 55 ते 62 जागा मिळतील. तर भाजपाला 18 ते 24 जागा मिळतील. तसंच आयएनएलडीला 3 ते 6 जागा मिळतील, जेजेपीला 0 ते 3 जागा मिळतील आणि उर्वरित 2 ते 5 जागा मिळतील.

'न्यूज 18'चा एक्झिट पोल : न्यूज 18च्या एक्झिट पोलनुसार, हरियाणामध्ये काँग्रेसला 59, भाजपाला 21 आणि इतरांना 10 जागा मिळण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले भूपेंद्र सिंह हुड्डा? : एक्झिट पोलच्या ट्रेंडवर बोलताना काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा म्हणाले, "आम्ही प्रचाराला सुरुवात केली तेव्हापासून मी सांगत आलोय की, काँग्रेसच्या बाजूनं लाट आहे. काँग्रेस प्रचंड बहुमतानं सरकार स्थापन करेल.

मुख्यमंत्री काय म्हणाले? : हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी म्हणाले की, "राज्यात भाजपाचं सरकार बहुमतानं स्थापन होईल, असा विश्वास आहे."

हेही वाचा

  1. "वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर...", केंद्र सरकारचं नेमकं म्हणणं काय? - Marital Rape
  2. वसाहतवादी नियम बदला! कारागृहातील जातीय भेदभावाविरोधात सुप्रीम कोर्टाचा निर्णय - Everyone Is Born Equal
  3. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5 ऑक्टोबरला 4 हजार रुपये येणार - PM Kisan 18th Installment

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.