कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळावर जाऊन अभिवादन केलं. यावेळी त्यांनी बाजूला सुरू असलेल्या पोवाडा कार्यक्रमात जाऊन शाहिरांना वंदन केलं. तसेच त्यांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि ऑटोग्राफ देखील दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाला भेट: कोल्हापूरात आज विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याहस्ते कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडलं. खरतर हा सोहळा शुक्रवारी संध्याकाळी पार पडणार होता. मात्र राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळं ते कोल्हापुरात पोहोचू शकले नाहीत. यामुळं आज सकाळी हा सोहळा पार पडला. यानंतर राहुल गांधी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासोबत आमदार सतेज पाटील, खासदार शाहू महाराज, विजय वडट्टीवार यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काही शिवप्रेमी आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे चरित्र पुस्तक भेट दिल.
आईच्या हस्ताक्षराखाली आपली हस्ताक्षर केल : त्यांनी माजी नगरसेवक आनंद माने यांच्याशी देखील खास संवाद साधला. यावेळी आनंद माने यांनी आणलेले इंदिरा गांधी आणि पंडित नेहरू यांच्यासोबतचे फोटो त्यांनी आवर्जून पाहिले. यावेळी आनंद माने यांनी 2003 साली सोनिया गांधी कोल्हापुरात आल्या होत्या त्यावेळी हे फोटो दाखवून त्यावर स्वाक्षरी घेतल्याचं सांगितलं. हे ऐकताच राहुल गांधी यांनी देखील आपल्या आईच्या स्वाक्षरी खाली आपली स्वाक्षरी देखील केली. तर राहुल गांधी यांच्या साधेपणाची चर्चा सर्वत्र रंगलेली पाहायला मिळाली.
हेही वाचा -