ETV Bharat / state

कळसुबाईच्या शिखरावर 'तरुणा'ची सायकलवारी! चप्पल न घालता सायकलवरून गाठला 'कळसूबाई शिखर' - Motivational Story

पालघर तालुक्यातील बोईसर येथील रामदास तातोबा जाधव या 52 वर्षाच्या व्यक्तीनं वाघोबा घाट एका दिवसात 56 वेळा चढ उतार करण्याचा पराक्रम केला.

Ramdas Jadhav
सायकलस्वार रामदास तातोबा जाधव (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2024, 10:23 PM IST

पालघर : "तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच भरत राहो! वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो!" सुरेश भट यांच्या कवितेच्या या ओळी. तरुण म्हणजे किती वयाचा असं विचारलं जातं. पण, तारुण्य हे वयावर नाही, तर मनावर अवलंबून असतं. हे अनेकांनी आपल्या कृतीतून वारंवार दाखवून दिलंय. पालघर तालुक्यातील बोईसर येथील रामदास तातोबा जाधव या 52 वर्षाच्या व्यक्तीनं चप्पल न घालता सायकलवरून महाराष्ट्रातील सर्वोच्च 'कळसुबाई शिखर' गाठून एक नवा पराक्रम नोंदवला. सव्वा वर्षात त्यांनी 15 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला असून सायकलिंग मधील हाफ एवरेस्टींग पूर्ण केलं.

तरुणपण आणि म्हातारपण हे शारीरिकदृष्ट्या वेगवेगळं असलं, तरी ते शरीराशी जसं निगडित आहेत तसं मनाशीही आहे. सजीवसृष्टीतील प्रत्येक वनस्पती आणि प्राण्यांच्या आयुष्यात फुलण्याचे दिवस अगदी थोडेच असतात. वनस्पतींना कळ्या येऊन फुलं येऊ लागली, की त्यांच्या आयुष्यातल्या भरणीचे दिवस सुरू होतात. माणसाच्या आयुष्यातले तारुण्याचे दिवस म्हणजे आयुष्यरुपी वृक्षाला सुंदर फुलांनी मोहरलेला बहर असतो. फुललेले रोपटे असो किंवा एखादा वृक्ष; तो जसा आजूबाजूचे परिसरातल्या इतर सजीवांना आकर्षित करतो, तसंच तारुण्यातली सतेज कांती, प्रफुल्ल चेहरा चालण्या- बोलण्यातला रुबाबदारपणा असं तरुण व्यक्तीचं व्यक्तिमत्व सर्वांनाच भुरळ पाडत असतं.

Ramdas Jadhav
सायकलस्वार रामदास तातोबा जाधव (Source - ETV Bharat Reporter)

रामदास जाधव यांच तारुण्य : फुलं जशी लवकर कोमेजतात तसंच तारुण्याचे दिवस झर्रकन निघून जातात. फुलासारखं तारुण्यही कोमेजू लागतं, हा निसर्गचा नियम असला, तरी माणसाच्या बाबतीत मात्र, शरीर तारुण्य आणि मन याचा परस्परांशी अन्योन्य संबंध आहे. मनुष्याला आपल्या आयुष्याकडे सकारात्मकतेनं पुढं बघण्याची, विचार करण्याची बुद्धी आहे. मात्र, बहुतेक माणसांची विचार करण्याची बुद्धी नकारात्मक असते. आता माझं वय झालं, तारुण्य संपलं असं रडगाणं अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात गात असतात. वयोमानानुसार, शरीर थकलेले असलं, तरी विचार करण्याची बुद्धी नकारात्मक असेल, तर माणूस खऱ्या अर्थानं वृद्ध होतो. मात्र, रामदास जाधव मात्र त्याला अपवाद आहेत.

रामदास जाधव यांचा आगळा वेगळा छंद : आयुष्यात सकारात्मक विचार असले, तर आपलं मन चिरतरुण ठेवता येतं. त्यामुळं विचारपुष्प कधीच थांबत नाही. त्याचा सुगंध वर्षानुवर्षे दरवळत राहतो. शरीरानं वयस्कर असलं आणि विचार आणि मनाने तरुण असणारे वृद्ध हे आयुष्याचा खऱ्या अर्थानं आनंद घेतात. अशी माणसं इतरांना आपल्या जगण्यातून नवी दिशा देत असतात. इतरांच्या आयुष्यात नवनवीन पालवी फुटायला मदत करत असतात. रामदास जाधव हे असंच एक व्यक्तिमत्व आहे. कुणाला गिर्यारोहणाचा, कुणाला मोटरसायकलवर भटकण्याचा, कुणाला चित्रं जमवण्याचा, कुणाला सह्या गोळा करण्याचा तर कुणाला अन्य काहीतरी करण्याचा छंद असतो. रामदास जाधव यांनाही असाच एक छंद आहे; परंतु तो आगळा वेगळा आहे.

सव्वा वर्षात त्यांनी पंधरा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास : लोक पायी डोंगर पार करत असतात. परंतु रामदास जाधव हे सायकलवरून मोठमोठी शिखरं गाठत असतात. कोरोनाच्या काळात डहाणू आणि पालघर तालुक्यातील हौशी सायकलस्वारांनी एकत्र येऊन 'बोईसर फ्लायर्स ग्रुप'ची स्थापना केली. रामदास जाधव या ग्रुपचे सदस्य आहेत. सव्वा वर्षात त्यांनी पंधरा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास केलाय. सायकलवरील प्रेमापोटीच त्यांनी कळसुबाई शिखरावर सायकलनं पोहोचण्याचा निर्धार केला. केवळ निर्धार करून ते स्वस्थ बसले नाहीत, तर 1646 मीटर उंचीचं कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर त्यांनी सायकलवरून गाठलं. त्यासाठी बोईसरमधील दुर्गअसावा ते श्री क्षेत्र कळसूबाई असा सायकल प्रवास व श्री क्षेत्र कळसुबाई पायथ्यापासून शिखरावर त्यांनी खांद्यावर सायकल उचलून त्यांनी असा प्रवास केला. ऑगस्टमध्ये अन्य भाविक, गिर्यारोहक आणि पर्यटकांची गर्दी असल्यानं लोखंडी शिडीवरून सायकल नेताना त्यांना त्रास झाला; परंतु त्यावर त्यांनी मात केली.

वाघोबा घाट 56 वेळा चढ उतार करण्याचा पराक्रम : जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टचे 8848 मीटर उंचीची चढाई करणं सोपं काम नाही. परंतु जाधव यांनी आतापर्यंत 2212 मीटर उंचीएवढी चढाई एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल सात वेळा पूर्ण केली. ही मोहीम राबवताना दीड-दोन तासापेक्षा अधिक विश्रांती न घेता सलग कामगिरी पूर्ण करावी लागते. ही राईड 'स्ट्रॉवा ॲप' वर नोंदवून एव्हरेस्टिंग वेबसाईटवर खातं बनवून अपलोड करावं लागतं. 'हॉल ऑफ फेम एव्हरेस्टिंग'मध्ये सायकलस्वार, देशाचं नाव व राईटचं सेगमेंट लिहावं लागतं. त्यात सात वेळा रामदास जाधव यांचं व देशाचं नाव झळकलं आहे. सायकलिंगमधील फुलएवरेस्टींग हा क्रीडा प्रकार करण्याचा त्यांचा मानस आहे. फुलएवरेस्टींग म्हणजे जगातील कोणत्याही टेकडीवर एकाच दिशेनं सतत वर खाली फेऱ्या मारणं. अशा प्रकारचं आव्हान रामदास जाधव यांनी स्वीकारलं असून त्यांनी पालघरमधील वाघोबा घाट पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत असा एक दिवसात 56 वेळा चढ उतार करण्याचा पराक्रम केला.

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.