ETV Bharat / state

कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे?; रोहित पवारांनी मागितली उमेदवारी - रोहित पवार

विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनाही उमेदवारीसाठी किरण काळे यांचे आव्हान

रोहित पवार विरुद्ध राम शिंदे?
author img

By

Published : Jul 2, 2019, 9:23 PM IST

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी पक्षाकडे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अधिकृतरित्या उमेदवारी मागितली आहे. रोहित पवार हे हडपसर किंवा कर्जत-जामखेडमधून विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील याबद्दल उत्सुकता होती. कर्जत-जामखेड मतदारसंघात त्यांनी गेल्या वर्ष-दोनवर्षांपासून संपर्क वाढवला आहे. त्यामुळे आता राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा सामना येत्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

रोहिप पवार यांनी दुष्काळी परिस्थितीत 80 च्यावर पाण्याचे टँकर सुरू करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, निवडणूक लढवण्याबाबत त्यांनी नेहमीच पक्षाकडे बोट दाखवत पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू असेच उत्तर दिले होते. मात्र, आता पक्षाने राज्यभरात इच्छुकांना प्रदेश किंवा जिल्हा राष्ट्रवादीकडे उमेदवारीबाबत अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. रोहित पवार यांनी हडपसर ऐवजी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीकडे अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे याच मतदारसंघातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तसेच जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मंजुषा गुंड, बाबासाहेब गांगर्डे यांनीही उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, यात रोहित यांचे पारडे निश्चितच जड असणार आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघावर नेहमीच भाजपचे वर्चस्व राहिले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचे या मतदारसंघावर वर्चस्व असताना आता रोहित पवारांच्या निमित्ताने त्यांना यावेळी मोठे आव्हान असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे विजयी उमेदवार डॉ. सुजय विखे यांना अपेक्षित आघाडी येथून न मिळाल्यानेही राम शिंदेंसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनाही उमेदवारीसाठी किरण काळे यांचे आव्हान-

जिल्ह्यात अकोले, श्रीगोंदा आणि नगर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पैकी अकोले आणि श्रीगोंदा येथून अजून कोणी इच्छुक पुढे आलेले नसले तरी नगर मतदारसंघात मात्र किरण काळे यांच्यासह दोन जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागून संग्राम जगताप यांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.

Intro:अहमदनगर- कर्जत मध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे होणार लढत !! रोहित पवारांनी मागितली राष्ट्रवादी कडे उमेदवारीBody:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_rohit_pawar_nomination_image_7204297

अहमदनगर- कर्जत मध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे होणार लढत !! रोहित पवारांनी मागितली राष्ट्रवादी कडे उमेदवारी

अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी पक्षाकडे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवण्यासाठी अधिकृतरित्या मागणी केली आहे. रोहित पवार हे हडपसर की कर्जत-जामखेड मधून विधानसभा लढवणार याबद्दल उत्सुकता होती. कर्जत-जामखेड मतदारसंघात त्यांनी गेल्या वर्ष-दोनवर्षां पासून संपर्क वाढवलेला आहे. दुष्काळी परिस्थितीत त्यांनी 80च्या वर पाण्याचे टँकर सुरू करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणूक लढवण्या बाबत त्यांनी नेहमीच पक्षाकडे बोट दाखवत पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू असेच उत्तर दिले होते. मात्र आता पक्षाने राज्यभरात इच्छुकांना प्रदेश किंवा जिल्हा राष्ट्रवादी कडे उमेदवरीबाबत अर्ज दाखल करण्यास सांगितले असताना रोहित यांनी हडपसर ऐवजी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस कडे अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे याच मतदारसंघातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तसेच जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मंजुषा गुंड, बाबासाहेब गांगर्डे यांनीही उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत.. मात्र यात रोहित यांचे पारडे निश्चितच जड असणार आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघावर नेहमीच भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचे या मतदारसंघावर वर्चस्व असताना आता रोहित पवारांच्या निमित्ताने त्यांना यावेळी मोठे आव्हान असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे विजयी उमेदवार डॉ सुजय विखे यांना अपेक्षित आघाडी येथून न मिळाल्याने ही राम शिंदें साठी धोक्याची घंटा मानली जातेय..

विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनाही उमेदवारी साठी किरण काळे यांचे आव्हान-
-जिल्ह्यात अकोले, श्रीगोंदा आणि नगर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पैकी अकोले आणि श्रीगोंदा येथून अजून कोणी इच्छुक पुढे आलेले नसले तरी नगर मतदारसंघात मात्र किरण काळे यांच्यासह दोन जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागून संग्राम जगताप यांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर. Conclusion:अहमदनगर- कर्जत मध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे होणार लढत !! रोहित पवारांनी मागितली राष्ट्रवादी कडे उमेदवारी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.