ETV Bharat / state

Ram Navami 2022 : शिर्डीतील रामनवमी सोहळ्याला 111 वर्ष पूर्ण; शेकडो पालख्या दाखल - शिर्डी रामनवमी सोहळा मराठी बातमी

रामनवमी ( Ram Navami 2022 ) उत्सव आला म्हटले की, हजारो भाविकांची पाऊले वळतात ती शिर्डीकडे. विशेषता: मुंबईतून मोठ्या प्रमाणात भाविक साईंची पालखी घेवून पायी चालत शिर्डीत ( Shirdi Palkhi Yatra ) येतात.

Ram Navami 2022
Ram Navami 2022
author img

By

Published : Apr 10, 2022, 3:32 PM IST

शिर्डी ( जि.अहमदनगर ) - रामनवमी ( Ram Navami 2022 ) उत्सव आला म्हटले की, हजारो भाविकांची पाऊले वळतात ती शिर्डीकडे. विशेषता: मुंबईतून मोठ्या प्रमाणात भाविक साईंची पालखी घेवून पायी चालत शिर्डीत ( Shirdi Palkhi Yatra ) येतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे भाविकांना पालख्या घेवून शिर्डीत येता आले नाही. मात्र, यंदाच्या वर्षी राज्य सरकारने कोरोनाचे नियम शिथिल केले असल्याने यंदाच्या रामनवमी उत्सवासाठी शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.

शिर्डीत दरवर्षी रामनवमी उत्सव मोठ्या भक्त भावाने साजरा केला ( Shirdi Ram Navmi Celebration ) जातो. गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट असल्यामुळे भाविकांना शिर्डीत पायी पालख्या घेवून येत आले नाही. मात्र, यंदाच्या वर्षी राज्य सरकारने कोरोनाचे नियम शिथिल केले असल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदाच्या रामनवमी उत्सवासाठी देशभरातुन भाविका शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी दाखल होत आहे.

भाविक प्रतिक्रिया देताना

गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतुन निघालेल्या साई सेवक, साईलिला अश्या मोठ्या पालख्या शिर्डीत दाखल होतात. या पालख्यांच्या आगमनाने साईंच्या गजराने शिर्डी गजबजून जाते. डोक्यावर रनरणत ऊन असूनही हे भाविक आपल्या श्रध्देपोटी पायी चालत शिर्डीला येतात. काही भाविक तर अनवानी पायने शिर्डीला येतात. साईंबद्दल असलेल्या श्रध्दा आणि भक्तीसाठी तसे हे भक्त वर्षभर शिर्डीला येत असतात. मात्र, रामनवमीच्या उत्सवासाठी पायी चालत येण्याच अनेक भक्तांची ही जणू अता प्रथाच पडली आहे.

आज लाखो भक्त पायी चालत शिर्डी मध्ये रामनवमी उत्सवात सामील झाले आहेत. हजारो मैल पायी पालख्या घेऊन शिर्डीला आलेल्या भक्तांच्या चेहऱ्यावर मात्र थकवा जाणवत नाही. शिर्डीत साईबाबांनी रामनवमी उत्सवास स्वतः सुरुवात केली होती. आज ह्या उत्सवास 111 वर्षा पूर्ण झाली आहेत. ह्या निमित्ताने देश भरातून शेकडो पालख्या आज शिर्डी मध्ये दाखल झाल्या आहे. या पालखी मार्गांवर साईबाबा संस्थानच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जागो जागी करण्यात आली आहे.

हेही वाचा - Remembrance of Jai Shri Rama : पावणेदोन कोटी वेळा लिहून केले 'श्रीरामा'चे नामस्मरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.