ETV Bharat / state

Made a Raincoat For The Goat: शेळ्यांची अशीही काळजी! रिकाम्या प्लॅस्टिकच्या गोणीचे शिवले रेनकोट - पावसाच्या बातम्या

डोंगरी भागातील वनवासी बांधवांनी आपल्या प्राणप्रिय शेळ्यांना रिकाम्या प्लॅस्टिक गोणीचे रेनकोट शिवलेत. हा जुगाड कमालीचा यशस्वी झाला. ( Raincoats made For Goat ) पावसाळ्यात भिजून व गारठ्याने काकडून शेळ्या मृत्यूमुखी पडू नयेत म्हणून हा उपाय केला जातो. आधी या रिकाम्या प्लॅस्टिक गोण्यांनी वनवासी बांधवांच्या डोक्यावरचे इलें हलके केले. आता त्यांच्याच रेनकोटने शेळ्यांचे जगणे सुकर झाले आहे.

शेळ्यांची अशीही काळजी
शेळ्यांची अशीही काळजी
author img

By

Published : Jul 14, 2022, 3:22 PM IST

भंडारदारा (अहमदनगर) - जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदारा धरणाचा परिसर हिरव्यागार डोंगररागांनी नटला आहे. तेथील हिरवळीवर चरण्यासाठी आलेल्या शेळ्यांच्या पाठीवरील हे प्लॅस्टिक गोण्यांचे रंगीबेरंगी रेनकोट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. ( Made a Raincoat For The Goat ) शेळीच्या पाठीवर गोणी अंथरायची आणि टोकाला बांधलेल्या दोऱ्या पोटाला बांधल्या की झाला रेनकोट तयार.

शेळ्यांसाठी  रिकाम्या प्लॅस्टिकच्या गोणीचे शिवले रेनकोट

रेनकोटांचे विविध रंग कमालीचे उठून दिसत आहेत - सध्या या रेनकोटमुळे पावसाचे पाणी व गारठ्यापासून शेळ्यांचा बचाव होतो. रंगीबेरंगी रेनकोट घातलेले शेळ्यांचे कळप पहाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. ( Heavy rain in Ahmednagar district ) हिरव्यागार गवताच्या गालीच्यावर या रेनकोटांचे विविध रंग कमालीचे उठून दिसत आहेत. ही कल्पना पाहून अनेक शेळी पाळणारांनी आता अशा कल्पना आमलात आणण्याचे प्रयत्न केले आहेत.

शेळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होईल अशीही भिती - पूर्वी आदीवासी शेतात काम करताना अथवा गुरे चारण्यासाठी जातांना स्वत्हाचा पावसापासून बचाव होण्यासाठी बांबूची तट्टी विणून त्यात सागाची पाने दाटीने बसवायची किंवा पातळ घोंगट्याचा तुकडा त्यात बसवावा लागे. इल्यांतली पाने किंवा घोंगट्याचा तुकडा पावसाने भिजला की ते जड होई. ही अडचण होत असल्याने शेळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होईल अशीही भिती होती.

रेनकोटने शेळ्या वाचविण्याचे काम केले - पुढे ही अडचण या प्लॅस्टिकच्या रिकाम्या गोण्यांनी दुर केली. या गोण्यांचे बारदान, इर्ल्यात जाऊन बसले. आता त्यात पावसाचे पाणी मुरत नाही आणि त्यावर थांबतही नाही. त्यामुळे हे इलें वजनाला हलके झाले. या प्लॅस्टिकच्या रिकाम्या गोण्यांनी आधी त्यांच्या डोईवरचे इलें हलके केले. आता त्यांच्याच रेनकोटने शेळ्या वाचविण्याचे काम केले जात आहेत.

हेही वाचा - Wilson Point in Mahabaleshwar: महाबळेश्वरमधील ब्रिटिशकालीन बुरूज ढासळला; जोरदार पावसाचा फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.