ETV Bharat / state

फुले 10001 या ऊस वाणाची राष्ट्रीय पातळीवर लागवडीसाठी शिफारस

फुले 10001 या लवकर पक्व होणाऱ्या ऊस वाणाची राष्ट्रीय पातळीवर लावगवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

ऊस
ऊस
author img

By

Published : Oct 28, 2020, 9:10 PM IST

राहुरी (अहमदनगर) - अखिल भारतीय समन्वित ऊस संशोधन प्रकल्पाची 33 वी राष्ट्रीय कार्यशाळा ऑनलाइन 19 व 20 ऑक्टोबरला पार पडली. या कार्यशाळेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे निर्माण केलेला फुले 10001 या लवकर पक्व होणाऱ्या ऊस वाणाची राष्ट्रीय पातळीवर लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या वाणाची शिफारस केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यात करण्यात आलेली आहे.

हा वाण फुले 265 आणि एम.एस. 602 या दोन वाणांचा संकर करून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथेच निर्माण केलेला पहिलाच ऊसवाण असून तो द्विपकल्पीय विभागातील 34 चाचण्यांमध्ये को.सी. 671 आणि को. 86032 पेक्षा ऊस आणि साखर उत्पादनात सरस ठरलेला आहे. व्दिपकल्पीय विभागातील 14 वेगवेगळया संशोधन केंद्रावर घेण्यात आलेल्या एकूण 34 प्रयोगात (प्रथम पीक, व्दितीय पीक आणि खोडवा) फुले 10001 या वाणाचे हेक्टरी ऊस आणि साखर उत्पादन अनुक्रमे 118.51 मे.टनआणि 16.84 मे.टन मिळालेले असून ते को.सी. 671 पेक्षा अनुक्रमे 22.82 टक्के आणि 18.39 टक्के अधिक आहे. तसेच को. 86032 पेक्षा ऊस आणि साखर उत्पादन अनुक्रमे 7.41 टक्के आणि 11.58 टक्के अधिक मिळालेले आहे. या वाणामध्ये रसातील साखरेचे प्रमाण (सुक्रोज) सरासरी 19.78 टक्के असून ते को. 86032 पेक्षा 2.71 टक्के अधिक आहे. फुले 10001 च्या खोडवा पिकाचे सरासरी हेक्टरी ऊस आणि साखर उत्पादन को.सी. 671 पेक्षा 23.92 टक्के आणि 22.72 टक्के अधिक मिळालेले आहे. तसेच को. 86032 पेक्षा खोडवा पिकाचे ऊस आणि साखर उत्पादन अनुक्रमे 1.09 आणि 7.57 टक्के अधिक मिळालेले आहे.

फुले 10001च्या ऊसाची पाने रूंद आणि गर्द हिरीव असून पानांच्या देठावर कुस नाही. ऊस जाड, मऊ आणि कांडया सरळ आहेत. तुर्याचे प्रमाण अल्प आहे. हा वाण खोडकीड, कांडी कीड, पिठ्या ढेकुण, शेंडे कीड यांना मध्यम प्रतिकारक आहेे. हा वाण तांबेरा, तपकिरी ठिपके आणि काणी या रोगास प्रतिकारक असून मर आणि लालकुज रोगांना मध्यम प्रतिकारक आहे.

हेही वाचा - अहमदनगर : जामखेड तालुक्यात उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई, अवैध दारूविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.