ETV Bharat / state

पृथ्वीराज चव्हाणांनी आत्मपरीक्षण करावे; विखे-पाटलांचा काँग्रेसला घरचा आहेर - congress

पक्षात माझी कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे मला वेगळा निर्णय घ्यावा लागला असल्याचे विखे-पाटलांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील
author img

By

Published : May 23, 2019, 6:26 PM IST

Updated : May 23, 2019, 6:41 PM IST

अहमदनगर - पृथ्वीराज चव्हाण यांनी आत्मपरीक्षण करावे, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. सुजय विखे-पाटील यांच्या विजयानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा युतीला मिळाल्या याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला घराच आहेर दिला. काँग्रेस पक्षात पक्ष संघटनेचे काम करण्यापेक्षा मुख्यमंत्री पदाचे दावेदार जास्त झाले असल्याचे ते यावेळी म्हणाले. पक्षहितापेक्षा स्वःहित साधण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे, त्यामुळेच राज्यात काँग्रेसची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील

यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. काँग्रेसच्या जागा का कमी झाल्या याचे त्यांनी परीक्षण करावे, असा सल्ला विखे-पाटील यांनी चव्हाणांना दिला. पक्षात माझी कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे मला वेगळा निर्णय घ्यावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले.

आपण तालुक्याचेच नेते होऊ शकत नाही आणि राज्याचे नेते व्हायचे स्वप्न पाहताय, असा टोलाही यावेळी विखेंनी बाळासाहेब थोरातांना लगावला.

Intro:
Shirdi_Ravindra Mahale

शिर्डी न्यूज फ्लॅश

काॅग्रेस पक्षात पक्ष संघटनेचं काम करण्यापेक्षा मुख्यमंत्री पदाचे दावेदार जास्त झाले ...
पक्षहितापेक्षा स्व हित साधण्याचा अनेकांचा प्रयत्न...
त्यामुळेच आज काॅग्रेसची पिछेहाट...
राधाकृष्ण विखे पाटील यांचा काॅग्रेसला घरचा आहेर...
पृथ्वीराज चव्हाण यांनी आत्मपरीक्षण करावे...
काॅग्रेसच्या जागा का कमी झाल्या याचं परीक्षण करावे ...
पक्षात माझी कोंडी करण्याचा प्रयत्न...
त्यामुळे मला वेगळा निर्णय घ्यावा लागला....
राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतीक्रीया...

मी कोणत्या पक्षात जावं हि उत्सुकता मिडीयालाच...
प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतीम निर्णय घेणार...

राज्याचं नेतृत्व करण्याच स्वप्न पाहणार्यांना स्वतःच्या मतदारसंघातही काॅग्रेस पक्षाची बुज राखता आली नाही ...
राधाकृष्ण विखे पाटील यांची थोरातांवर टिका...
आपण तालूक्याचेच नेते होवू शकत नाही आणी राज्याचे नेते व्हायचं स्वप्न पाहताय...
मुंगेरीलाललाही स्वप्न पडतच होते ...
विखेंची थोरातांवर खोचक टीका...
थोरातांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज...
जिल्ह्यात युतीचे संघटन मजबूत...Body:MH_AHM_Radhkrushan Vikhe Patil_23 May_MH10010Conclusion:MH_AHM_Radhkrushan Vikhe Patil_23 May_MH10010
Last Updated : May 23, 2019, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.