अहमदनगर - नगर दक्षिणची जागा काँग्रेसला सोडावी अशी मागणी करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधींना भेटायला गेलो होतो. त्यावेळचा अनुभव धक्कादायक असल्याचे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. सुजयने राष्ट्रवादीच्याच तिकिटावर निवडणूक लढवावी, असे राहुल गांधींनी सुचवले होते. ही गोष्ट धक्कादायक असल्याचे विखे-पाटील म्हणाले. पक्षाच्या नेत्यांनी भक्कमपणे पाठीमागे उभे राहायला हवे होते, असेही विखे पाटील म्हणाले. नगर दक्षिणमधून राष्ट्रवादीचा ३ वेळेस पराभव झाला होता. त्यामुळे यावेळेस ही जागा काँग्रसेला सोडण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही भेटलो असल्याचे विखे म्हणाले.
आघाडीत बिघाडी नको म्हणून प्रचाराला गेलो नाही
आघाडीत बिघाडी होऊ नये म्हणून म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रचाराला गेलो नसल्याचेही वक्तव्य विखे पाटील यांनी केले. नगर दक्षिणच्या जागेची निवडणूक व्यक्तीगत पातळीवर आली म्हणून मुलाच्या पाठीमागे उभे राहिल्याचे विखे पाटील म्हणाले.