अहमदनगर - विरोधीपक्ष नेतेपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांना भाजपने थेट मंत्रिपद दिले. विखे पाटलांच्या या निवडीस न्यायालयातही आव्हान देण्यात आले आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विखे पाटलांची निवड ही बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. यावर विखे-पाटील म्हणाले, माझ्या मंत्रिपदाला आव्हान देणारी याचिका दाखल झाली आहे, ती न्यायप्रविष्ट विषय असल्याने मी त्यावर जास्त बोलणार नाही, मात्र पुथ्वीराज चव्हाण यांनी माझी काळजी करण्यापेक्षा स्वत: ची आणि ते मुख्यमंत्री असताना जी पक्षाची अधोगती झाली याची काळजी करण्याची आवशकता आहे, अशी टीका गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांनी चव्हाण यांच्यावर केली.
मंत्रिपदाची शपत घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच विखे-पाटील आपल्या लोणी गावी आल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच जोरदार स्वागत केले आहे. लोणीच ग्रामदैवत म्हसोबा महारांज दर्शन घेतल्यानंतर विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना चव्हाण यांच्यावर टीका केली. तसेच माझ्यावर पक्षाने विश्वास व्यक्त करत कॅबिनेट पद दिले आहे. पंतप्रधान आणि पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांनी जो विश्वास दाखवला त्यास पात्र राहाण्याचा माझा प्रयत्न राहील.
सरकारमध्ये सामिल होताच विखे-पाटलांचे सूर बदललेले पहायला मिळत आहे. आम्ही विरोधात असताना माहितीच्या आधारे काम करण्यास सांगत होतो मात्र त्यापेक्षा चांगलं काम सरकार करत आहे. दुष्काळाची दाहकता बघता जी सरकारकडून अपेक्षा करत होतो त्यापेक्षा जास्त मदत सरकार करत आहे.