ETV Bharat / state

आमची बांधिलकी जनतेशी... कधी 'सिल्व्हर ओक' तर, कधी 'मातोश्री'वर अस्वस्थ येरझारा घालत नाही! - सामना अग्रलेख आणि राधाकृष्ण विखे पाटील

'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रात भाजपा नेते राधाकृष्ण विखे यांच्यावर अग्रलेख छापण्यात आला. 'थोरातांची कुरकुर नाहीच; विखेंची टुरटुर' या शीर्षकाखाली लिहिलेल्या अग्रलेखाबद्दल विखे यांनी संजय राऊत यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात त्यांनी पत्रक जारी केले असून त्यामध्ये संजय राऊत यांच्या अग्रलेखाला प्रत्युत्तर दिले आहे.

radhakrishna vikhe on sanjay raut
आमची बांधिलकी जनतेशी...कधी 'सिल्व्हर ओक' तर कधी 'मातोश्री'वर अस्वस्थ येरझारा घालत नाही!
author img

By

Published : Jun 23, 2020, 1:15 PM IST

अहमदनगर - 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रात भाजपा नेते राधाकृष्ण विखे यांच्यावर अग्रलेख छापण्यात आला. 'थोरातांची कुरकुर नाहीच; विखेंची टुरटुर' या शीर्षकाखाली लिहिलेल्या अग्रलेखाबद्दल विखे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात त्यांनी पत्रक जारी केले असून त्यामध्ये संजय राऊत यांच्या अग्रलेखाला प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे संजय राऊत आणि राधाकृष्ण विखे यांच्यात जुंपल्याचे चित्र आहे. सध्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चर्चा रंगली आहे.

प्रसिद्धीपत्रकामार्फत प्रत्युत्तर...

आपल्याच शब्दांत सांगायचे तर, मी सध्या वनवासात आहे. वनवासात असलेल्या विखेंची तुम्हाला अग्रलेख लिहून दखल घ्यावी लागली, हेही नसे थोडके! मी राजकारणापासून दूर राहिलेलंच बरं, असा सल्लाही आपण दिलाय. फक्त जनता जनार्दनाला साक्षी ठेवून एवढेच सांगू इच्छितो की, मी आपल्या कृपेने राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे आपल्या सल्ल्याने राजकारणापासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला, माझ्या मुलाला व आतापर्यंत माझ्या घराण्याला राजकारणात भरभरून प्रतिसाद देण्याचे काम नगर जिल्ह्यातील जनतेने केले आहे. आमची बांधिलकी त्या जनतेशी आहे. आमची बांधिलकी कधी 'सिल्व्हर ओक' तर, कधी 'मातोश्री' अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यांसोबत आणि अर्धी नाळ 'शरदा'च्या चांदण्यात भिजतेय, असा दुटप्पीपणा कोण करतेय, तेही लपून राहिलेलं नाही.

बाळासाहेबांच्या काळात धारदार अग्रलेखांची परंपरा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख असत. आजच्यासारखी लाचारी त्यावेळी नव्हती. आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले का ? आम्ही राजकीय पक्ष बदलले, पण ज्या पक्षात राहिलो, त्याचे निष्ठेने काम केले. आमची छाती फाडून पाहिली तर, एका वेळी एकच नेता दिसेल. तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील. तुमचा हा बेगडीपणा लोकांना चांगलाच कळतो. त्यामुळेच तुम्हाला फारसे गांभीर्याने घ्यायचे नसते, हे आता लोकांना कळू लागले आहे. एकीकडे, राजभवनाबाबत धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून, लवून राजभवनावर कुर्निसात करायचा, हे कोलांटीउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता, हे अलीकडे महाराष्ट्राने पाहिले आहेच.

मी भाजपामध्ये आनंदी आहे. पण महाविकास आघाडी सरकारचा एक शिल्पकार असल्याच्या अविर्भावात राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या भावास मंत्रीदेखील करू न शकल्याचे दुःख असेल आणि त्यातून आलेली कमालीची अस्वस्थता दाबून ठेवण्याचा नाहक त्रास होत असेल, तर त्यात माझा काय दोष? 'थोरातांची कमळा' असा काहीसा उल्लेख आपण अग्रलेखात केला आहे. कमळ हातात घेण्यासाठी रात्रीच्या अंधारात कोणी, केव्हा, कुठे कशी चाचपणी केली होती, हा एक वेगळा इतिहास आहे. ती चाचपणी यशस्वी झाली असती, तर आपण केलेला उल्लेख कदाचित खरा ठरला असता. आज त्याच्या खोलात मला जायचे नाही. मातोश्रीविरुद्ध बंड करण्यासाठी 'कृष्णकुंज'ला कुणाची चिथावणी होती, आणि कोणी वेळेवर 'यू-टर्न' घेतले हा इतिहास अनेकांना माहिती आहेच; मी वेगळा काय सांगावा...
अशा शब्दांत राधाकृष्ण विखे यांनी संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका केलीय.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.