ETV Bharat / state

Shirdi Nagar Panchayat : शिर्डीकरांचा विजय झाला - राधाकृष्ण विखे पाटील - Shirdi Nagar Panchayat election crisis

शिर्डीच्या नागरिकांचा विजय झाला आहे. शिर्डी नगरपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेमध्ये व्हावी यासाठी सर्वपक्षीय लढा दिला होता, तो यशस्वी झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील
author img

By

Published : Dec 7, 2021, 9:14 PM IST

Updated : Dec 7, 2021, 11:27 PM IST

शिर्डी(अहमदनगर) - शिर्डीच्या नागरिकांचा विजय झाला आहे. शिर्डी नगरपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेमध्ये व्हावी यासाठी सर्वपक्षीय लढा दिला होता, तो यशस्वी झाला आहे. एकाच कुटुंबातील दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, संपूर्ण गावाची निवडणूक न व्हावी हीच इच्छा आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरलेल्यांनी नागरिकांच्या इच्छेचा आदर करत नामनिर्देशन अर्ज मागे घेतले पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil) दिली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटच्या दिवशी नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. या निवडणुकीवर शिर्डीतील सर्वपक्षीय नेत्यांनी बहिष्कार टाकलेला असल्याने शेवटच्या दिवशीही कोणीही अर्ज भरु नये अशी इच्छा सर्वपक्षीय ग्रामस्थांची होती. मात्र, दुपारी माजी नगरसेवक सुरेश आरणे आणि त्यांच्या पत्नीने ग्रामस्थांनी अर्ज न भरण्याची मागणी धुडकावत प्रभाग क्रमाक 1 मधून सुरेश आरणे यांच्या पत्नीने तर 11 मधून सुरेश आरणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शिर्डीत येऊन सर्वपक्षीय नेत्यांसमवेत नगरपंचायतीजवळ ठाण मांडून बसले होते. एरवी निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करणाऱ्यांची गर्दी होत असते. मात्र आज शिर्डी नगरपंचायती समोर कोणी अर्ज दाखल करायला जाऊ नये यासाठी गर्दी झाल्याचे दिसुन आले. संध्याकाळी पाच वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर केवळ दोनच अर्ज दाखल झाले होते. आता या अर्जाची उद्या छाननी होणार आहे.

उद्याच्या अर्ज छाणनीत अर्ज राहातात की उडतात, जर अर्ज राहिले तर तेरा डिसेंबरपर्यंत माघार घेण्याच्या मुदतीपर्यंत आरणे यांचे मन वळविण्यात शिर्डीकर प्रयत्न करणार आहेत. आज पाच वाजेपर्यंतची अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर दोन अर्ज वगळता कोणताही अर्ज न भरला गेल्याने शिर्डीकरांनी फटाके फोडून साईनामाचा गजर करत मिशन फत्ते झाल्याचा आनंद साजरा केला. यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी हा गावचा विजय असल्याचे म्हणाले.

शिर्डी नगरपंचायतीवर प्रशासक येणार?

राज्य शासनाने शिर्डी नगरपंचायतीची नगरपरिषद करण्याची आधिसुचना काढली आहे. दुसरीकडे नगरपंचायतीच्या जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत दोन उमेदवारी अर्ज दाखल झालेत. ते अर्ज कायम राहतात की माघारी घेतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. मात्र, दुसरीकडे शिर्डी नगरपंचायतीवर प्रशासक येण्याचेही जवळपास निश्चित झाले आहे.

Last Updated : Dec 7, 2021, 11:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.