अहमदनगर - वाळू माफियांवर नियंत्रण मिळविण्यात महसूल विभागाला अपयश येत आहे. या संदर्भात शिर्डी विधानसभा मतदार संघातील काही गावांमध्ये स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करुन वाळु माफीयांचा बंदोबस्त करणार असल्याची माहिती माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शिर्डी विधानसभा मतदार संघातील गावांमध्ये कार्यरत असलेल्या तलाठी आणि ग्रामविकास आधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसुल यंत्रणेतील त्रृटींवर बोट ठेवून तलाठी आणि ग्रामसेवकांचा जबाबदारीची जाणिव करुन दिली.
हेही वाचा -
'वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करा'
महसुल विभागाची कार्यप्रणाली ठरलेली असल्यामुळे चाकोरीच्या बाहेर जावुन काम होत नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणेपेक्षा थेट लोकप्रतिनिधींनाच लोकांच्या रोषास सामोरे जावे लागते. शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवरच शासकीय यंत्रणेचे यश अवलंबुन असते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्या मतदार संघातील बहुतांशी गावांमध्ये वाळु माफीयांनी मोठ्या प्रमाणात दांडगाई सुरु केली आहे. यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली असुन तलाठी, ग्रामसेवक यांच्या अकार्यक्षमतेमुळे वाळु चोरीच्या संदर्भातील माहीती वरिष्ठांपर्यंत जात नाही. हेच आता उघड होत आहे. या वाळु माफीयांचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्या मतदार संघातील काही गावांमध्ये स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असुन ही यंत्रणाच आता महसुल विभागाला माहीती देण्याचे काम करेल. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी आपण चर्चा केली असल्याचेही विखेंनी सांगितले.
हेही वाचा -
'राज्यात घडणाऱ्या घटनांचा तपास महाराष्ट्र पोलिसांनीच करायला हवा'
शासकीय यंत्रणेचा सर्व कारभार आता ऑनलाईन पध्दतीने सुरु आहे. तुम्ही कोणतीही माहिती लपविण्याचा प्रयत्न केला तरी नागरिक गुगलवर जाऊन माहिती मिळवितो. त्यामुळे गावपातळीवर प्रत्येक काम आता डिजिटल पध्दतीने तुम्हाला करावेच लागेल. कोणतीही माहिती चुकीची देवून तुम्ही आता कोणाचीच दिशाभूल करु शकणार नाही. तुमच्या कामांची गुणवत्ता आणि त्रृटी यावरच महसूल यंत्रणेचे यश अवलंबून असल्याचे स्पष्ट करुन विखे पाटील यांनी सांगितले की, गावची स्मशानभूमीही स्वच्छ होत नाही. याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित करुन तुमच्या कामाचा प्रभाव समाजामध्ये पाडायचा असेल तर गावपातळीवरचे पदाधिकारी आणि नागरीक यांच्यातील दुवा म्हणुनच तुम्हाला काम करावे लागेल.
राहाता तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील अनेक समस्यांवर विखे पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीसाठी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे, उपविभागीय कृषी आधिकारी सुधाकर बोराळे, संगमनेरचे नायब तहसिलदार सुभाष कदम, राहाता पंचायत समितीचे विस्तार आधिकारी ठाकुर, शंकरराव गायकवाड यांच्यासह महसूल विभागील आधिकारी उपस्थित होते.