ETV Bharat / state

'मी स्वीकारलेला रस्ता योग्यच, रस्ता बदलण्याची गरज नाही'

आज (बुधुवार) श्रीरामपूरमध्ये माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. या कार्यालयावर लावलेल्या फलकावर कोणत्याही पक्षाचे चिन्ह अथवा कोणत्याही नेत्याचा फोटो नव्हता. त्यामुळे याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. मात्र, विखे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Radakrushn vikhe patil comment on Mahavikas aaghadi
राधाकृष्ण विखे पाटील
author img

By

Published : Feb 19, 2020, 11:30 PM IST

Updated : Feb 20, 2020, 3:58 PM IST

अहमदनगर - श्रीरामपूरमध्ये माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. मात्र, या कार्यालयावर लावलेल्या फलकावर कोणत्याही पक्षाचे चिन्ह अथवा कोणत्याही नेत्याचा फोटो नव्हता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होत्या. मात्र, याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली मी जो रस्‍ता स्वीकारला आहे, तो योग्‍यच आहे. मी समाधानी असून आता रस्‍ता बदलण्‍याची गरज नसल्याचे विखे पाटील म्हणाले. तसेच श्रीरामपूर येथील कार्यालय हे सर्वपक्षीय कार्यकर्त्‍यांच्‍या संपर्कासाठी असल्याचे ते म्हणाले.

कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेल्या फलकावर चलो एक पहल की जाए… नए रस्ते की ओर…असे वाक्य लिहिले होते. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, ज्‍या फलकावरुन चर्चा सुरू आहे, त्‍यावरील वाक्‍य हे श्रीरामपूरच्या होत असलेल्या आधोगती संदर्भात आहे. भविष्‍यात या तालुक्याला आम्‍हाला वेगळ्या दिशेने घेवून जायचे असल्‍याचे विखे पाटील यावेळी म्हणाले.

राधाकृष्ण विखे पाटील

आता इंदोरीकर महाराजांच्‍या पाठीशी देवच उभा राहील

इंदोरीकर महाराजांच्‍या संदर्भात बोलताना विखे पाटील म्हणाले की, त्‍यांच्‍याबद्दल मला नितांत आदर आहे. त्‍यांचे प्रबोधनाचे काम खूप मोठे आहे. परंतू, प्रबोधन करतानाही थोडासा संयम असायला हवा. ‘आता देवच त्‍यांच्‍या पाठीशी उभा राहील’ असे वक्तव्यही विखे पाटील यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीवरही विखे पाटील यांनी टीका केली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्‍या प्रेमाचे उमाळे पाहून राज्‍यातील जनता तुमच्‍यापासून दूर जात आहे. याचे भान असू द्या, असेही विखे पाटील म्हणाले.

शिवसेना, काँग्रेसचा रिमोट दुसऱ्याच्या हाती

एल्‍गार परिषदेचा तपास एन.आय.एकडे देण्‍याबाबतच्‍या मुख्यमंत्र्यांच्‍या निर्णयाला सरकारमधील घटक पक्षच विरोध करत आहेत, हे आश्‍चर्यकारक आहे. यावरुन महाविकास आघाडीतील विसंवाद सुरुचं आहे. एन.आय.ए कडे तपास दिला तर भीती वाटायचे कारण काय? असा सवाल राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. शिवसेना आणि कॉंग्रेसचा रिमोटच आता दुस-याच्‍या हातात गेल्‍याने ते सांगतील त्‍याच पध्‍दतीची विधानं केली जात असल्‍याची टीका केली.

एल्‍गार परिषदेचा तपास एन.आय.ए कडे देण्‍यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलेल्‍या भीतीबाबत आपली प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना विखे पाटील म्‍हणाले की, मुख्‍यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा अभिनंदनीय आहे. यापूर्वी विरोधी पक्षनेता असताना हीच भूमिका आपण सभागृहात मांडली होती. मात्र, आज वेगवेगळी मतं मांडणा-या लोकांना या विषयाचा पान्‍हा फुटला आहे. यापूर्वी या विषयाबाबत हीच मंडळी गप्‍प बसली होती असेही विखे पाटील म्हणाले.

एन.आय.ए च्‍या निर्णयाबाबत बाळासाहेब थोरात यांनी व्‍यक्‍त केलेली प्रतिक्रिया हे त्‍यांचे स्‍वत:चे मत नाही. मुख्‍यमंत्र्यांनी घेतलेल्‍या निर्णया बरोबर राहणे हे सुत्र साधारणपणे स्वीकारायचे असते. पण थोरातांना हा विषयच समजलेला नाही. आंबेडकरवादी चळवळीचा संदर्भ या विषयाशी नाही. कोणाच्‍या तरी सांगण्‍यावरुन त्‍यांनी हे वक्तव्य केले आहे. दुसऱ्याच्या हातातील बाहुलं बनून भूमिका मांडण्‍याचा केलेला त्‍यांचा प्रयत्‍न महाराष्‍ट्र पाहत असल्याचे विखे पाटील म्हणाले.

मुख्‍यमंत्र्यांचा सरकारवर कंट्रोल राहीलेला नाही. शिवसेना आणि काँग्रेसचा रिमोट कंट्रोलही दुस-याच्‍याच हातात गेल्‍याने ते सांगतील तशीच मतं आता मांडण्‍याचा सपाटा सुरु असल्याचे विखे पाटील म्‍हणाले.

Last Updated : Feb 20, 2020, 3:58 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.