ETV Bharat / state

Honor Killing : साईंच्या पालखी पदयात्रेत ऑनर किलींग! बहिणीच्या नवऱ्याला संपवण्याचा तरुणाचा प्रयत्न

author img

By

Published : Dec 30, 2022, 8:13 PM IST

कुटूंबाच्या इच्छेविरोधात जावून लग्न करणाऱ्या ( marrying against the family ) बहिणीच्या नवऱ्यावर ( Honor killing his sister husband ) यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या तरुणाने पदयात्रेने येणाऱ्या साईपालखी सोहळ्यात दोन गोळ्या झाडल्या ( Pusad young man attempts on Honor killing ) आहेत. यात बहिणीचा नवरा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर पळून जाणाऱ्या आरोपीला अन्य पदयात्रींनी पकडून चोप दिल्याने तोही जखमी झाला आहे. या दोघांनाही उपचारासाठी साई संस्थानच्या रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Honor Killing
गोळाबार झाल्यानंतर जागेची पाहणी करताना अधिकारी
पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील घटनेबद्दल माहिती देताना

अहमदनगर : जिल्ह्यात साईपालखीच्या पदयात्रेतच ऑनरकिलिंग करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीने पळून जावुन लग्न करण्याचा ( marrying against the family ) राग मनात असताना पुसदच्या तरूणाने पदयात्रा शिर्डीत दाखल होण्यापूर्वीच थेट बहिणाच्या नवऱ्यावर गोळीबार ( Pusad young man attempts on Honor killing ) केला आहे.

काय आहे प्रकरण : मुंबईतील गोरेगावची द्वारकाधीश ही साईंची पायी पालखी दहा पंधरा दिवसांपुर्वी शिर्डीला निघाली. मुंबईतुन निलेश पवार व त्याची पत्नी या पालखीतुन पायी शिर्डीला साईदर्शनासाठी निघाले. याबाबतची माहिती पुसद येेथे राहणाााऱ्या विकी भांगेला समजताच त्याने मेहुण्याचा पदयात्रेतच काटा काढण्याचा निर्णय घेतला. तो मुंबईपासुन या पालखीच्या पाळतीवर होता. शिर्डी अगदी पाच किमी अंतरावर आली तरी त्याला योग्य संधी मिळत नव्हती. अखेर, आज शुक्रवारी दुपारी ही पालखी शिर्डीजवळील सावळेविहीर येथे नाष्टा करण्यासाठी थांबलेली असतांना विकीने गावठी कट्टयातुन मेहुणा निलेश पवार याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या गोळ्या निलेशच्या खांद्याला लागल्या. यानंतर पळुन जाण्याचा प्रयत्न करत असतांना विकीला पालखीतील अन्य पदयात्रींनी पकडून चांगला चोप देत पोलीसांच्या ताब्यात दिले. ‘जाको राखे साईया मार सके ना कोई’ याचा प्रत्यय पदयात्रींना या निमीत्ताने आला.

आरोपीचा ऑनरकिलींगचा प्रयत्न : या ऑनरकिलिंगच्या घटनेबाबत पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले, की यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील विकी भांगे याच्या बहिणीने दोन वर्षापुर्वी निलेश पवार या तरुणाबरोबर पळून जावून लग्न केले होते. मुंबईत वाहन चालक म्हणून काम करणारा निलेशचा सुखी संसार सुरू होता. मात्र कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध झालेल्या या लग्नामुळे विकी भांगे याच्या मनात निलेश पवार याच्याविषयी राग होता. तो निलेशला संपवण्यासाठी संधीच्या शोधातच होता.

दोघांवर उपचार सुरू : पोलीसांनी गोळीबारात जखमी झालेला निलेश पवार व पदयात्रींच्या मारहाणीत किरकोळ जखमी झालेला आरोपी विकी भांगे या दोघांनाही उपचारासाठी साई संस्थानच्या रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. निलेशचा धोका टळल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी विकी भांगे याच्या विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीकडील गावठी कट्टा जप्त केला आहे. पोलीस उपअधिक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील पुढील तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.