ETV Bharat / state

Puntamba Farmers Agitation : पाच वर्षांनंतर पुन्हा पुणतांब्यात शेतकरी आंदोलनाला बसणार, 'या' आहेत मुख्य मागण्या - Ahmednagar Latest News

राहाता तालुक्यातील पुणतांबा गावात आज पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन करण्यासाठी ( Puntamba Farmers will start agitation ) शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले. 2017 मध्ये झालेल्या शेतकरी संपाच्या नंतर पुन्हा एकदा शेतकरी संपासाठी पुणतांबा ग्रामपंचायतच्या पटांगणात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात ( Puntamba Farmers Agitation ) आला.

Puntamba Farmers Agitation
पुणतांब्यात शेतकरी आंदोलनाला बसणार
author img

By

Published : May 19, 2022, 7:12 PM IST

अहमदनगर -राहाता तालुक्यातील पुणतांबा गावात आज पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन करण्यासाठी ( Puntamba Farmers will start agitation ) शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले. 2017 मध्ये झालेल्या शेतकरी संपाच्या नंतर पुन्हा एकदा शेतकरी संपासाठी पुणतांबा ग्रामपंचायतच्या पटांगणात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात ( Puntamba Farmers Agitation ) आला.

23 मेला आयोजन ग्रामसभा - शेतकरी मालाला बाजारभाव, शिल्लक राहिलेला ऊस, कांद्याचे गडगडले भाव, दुधाला रास्त भाव द्यावा यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले. फक्त पुणतांबाच्या शेतकऱ्याचा विचार न करता महाराष्ट्रच्या शेतकऱ्याचा विचार करत आंदोलन करण्यात यावे. पक्षसंघटना बाजूला ठेऊन शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकऱ्यासाठी पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन करण्याची गरज प्रत्येक शेतकऱ्यांनी बैठकीत बोलून दाखविली. लवकरच ग्रामसभा घेऊन आंदोलनाची दिशा, कमिटीची निवडीसाठी सोमवार दिनांक 23 मेला आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येकाने या आंदोलनाची माहिती सर्व शेतकऱ्यांना द्यायची आहे. असे बैठकीत ठरवले आहे.

Puntamba Farmers Agitation
पुणतांब्यात शेतकरी आंदोलनाला बसणार

शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी येणार एकत्र - मागील आंदोलनात अपरिपक्व होतो, आता परिपक्व होऊन आंदोलन करण्यात येईल. डॉ. धनंजय धनवटे, सुहास वहाडणे, धनंजय धोर्डे, विठ्ठलराव जाधव, चंद्रकांत वाटेवर, नामदेवराव धनवटे, बाळासाहेब चव्हाण, सुभाष कुलकर्णी, दत्तात्रय धनवटे, सर्जेराव जाधव, राजेंद्र थोरात, अनीलराव नले, बाळासाहेब भोरकडे, कांदा, ऊस, गहू, दुधाचे दर कायम राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या विरोधात उभे राहून आयात निर्यातवर नियंत्रण राहिले पाहिजे. यासाठी एकत्र येत शेतकऱ्याचे अनेक प्रश्न असून आपले मुद्दे सरकारला मांडण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

या आहेत मागण्या....

  • कारखान्यांनी परिसरातील ऊस शिल्लक राहू देऊ नये,जो ऊस राहील त्याची नुकसान भरपाई म्हणून शासनाने त्याच्या साठी काढलेले कर्ज, खर्च, शासनाने करावा.
  • पूर्ण दाबाने दिवसा वीज पुरवठा शासनाने करावा.
  • उसाला दोन लाख अनुदान,कांद्याला 2000रुपये नाफेडने हमी भाव शेतकऱ्यांना मुबलक खते, कर्ज माफीची, अमलबजावणी झाली पाहिजे.
  • शेतकऱ्याचा प्रश्न आज तयार झाला नसून घटनेतील परिशिष्ट नऊ रद्द, शेतकऱ्यांना शेतीमालाचे भाव व वेतन आयोगाचा ताळमेळ बसविणे, शिल्लक ऊस बाबत साखर संघाने नियोजन करणे.

हेही वाचा - Balgandharva Rang Mandir : पुण्याची शान 'बालगंधर्व रंगमंदिर', ५४ वर्ष नाट्यरसिकांच्या अविरत सेवेचे पर्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.