ETV Bharat / state

आखाडा विधानसभेचा : अकोल्यात पिचडांना कोण देणार टक्कर? - अकोले विधानसभा मतदारसंघ

अकोले विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे. ही जागा अनुसूचित जमाती अर्थात 'एसटी' प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे येथे पिचडांना कोण टक्कर देणार हे पाहणे महत्तवाचे आहे.

अकोले विधानसभा मतदारसंघ
author img

By

Published : Aug 30, 2019, 3:01 PM IST

शिर्डी - विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने यात्रांचा सपाटा लावून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यातच पळवापळवीच्या राजकारणालाही वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारत घेऊन येत आहे आढावा मतदारसंघाचा. आज पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा थेट ग्राऊंड झिरोवरुन....

अकोले विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे. ही जागा अनुसूचित जमाती अर्थात 'एसटी' प्रवर्गासाठी राखीव आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अकोले विधानसभा मतदारसंघाचा सविस्तर आढावा

हेही वाचा - शिर्डी विधानसभा आढावा: विखेंना शह देण्यासाठी सत्यजित तांबे सज्ज?

सह्याद्रीच्या पर्वतरांगा, भंडारदरा धरण, महाराष्ट्रातील अतिउच्च शिखर कळसुबाई, निसर्गाने नटलेला हरिषचंद्र गडाचा परिसर तसेच अनेक ऐतिहासिक स्थळे आणि मंदिरेही याच मतदारसंघात येतात. भंडारदरा, निळवंडे या मोठ्या धरणांसह अनेक छोट्या धरणांचा समूह आणि निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला तालुका म्हणजेच अकोले विधानसभा मतदारसंघ.

मधुकर पिचड यांचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ तसा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा गड होता. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पिचड राष्ट्रवादीसोबत राहिले तेव्हापासून आत्तापर्यंत अकोले राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे.

हेही वाचा - आढावा उस्मानाबाद विधानसभेचा : राजेनिंबाळकरांना थोपवण्यासाठी पाटील जाणार भाजपत?

पिचडांनी अनेक वर्ष आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिले आहे. या काळात पिचड परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशील होते. पर्यटन स्थळांचा विकास, आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात ते आग्रही असायचे. तसेच अनेक छोट्या धरणांची निर्मिती पिचडांनी तालुक्यात केली आहे. तालुका केवळ पाणीदार करुन पिचड थांबले नाही तर सहकाराची चळवळही येथे आणली आहे. अगस्ती सहकारी साखर कारखाना, अमृतसागर दूधसंघ त्यांच्या नेतृत्वात उभे राहिले. नगरपरिषद तसेच अनेक ग्रामपंचायती पिचडांच्या अधिपत्याखाली आहेत. 2014 साली मधुकर पिचडांनी आपले पुत्र वैभव पिचड यांच्यावर आमदारकीची जबाबदारी सोपवली. या निवडणुकीत वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवत 20 हजारांच्या मताधिक्यानं शिवसेनेचे मधुकर तळपाडे यांचा पराभव केला. भाजप शिवसेना स्वतंत्र लढल्याने झालेले मताचे विभाजन पिचडांच्या पथ्यावर पडले आहे.

हेही वाचा - संगमनेर विधानसभा आढावा : विखे पाटील पाडणार थोरातांच्या बालेकिल्ल्याला खिंडार?

नुकतेच पिचड पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी नावालाच शिल्लक राहिल्याचे म्हणावे लागेल. दुसरीकडे भाजपचे अशोक भांगरे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे तसेच शिवसेनेचे नेते आणि पंचायत समिती उपसभापती मारूती मेंघाळ यांनी एकत्र येत पिचडांविरोधात दंड थोपटले आहेत. डॉ.किरण लहामटे यांनी पिचडांचा भाजप प्रवेश होताच राष्ट्रवादीच्या गोटात जाण्याचा पवित्रा घेतला आहे. अजित पवारांची त्यांनी भेटदेखील घेतली आहे. सध्या हे तीनही विरोधक पिचडांना टक्कर देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या तिघांचे मनोमिलन झाले तर वैभव पिचडांसमोर मोठे आव्हान उभे राहणार हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे येणाऱया निवडणुकीत आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.