ETV Bharat / state

Aurangzeb Photo : औरंगजेबचा फोटो असलेले पोस्टर मिरवणुकीत झळकले; व्हिडिओ व्हायरल, उपमुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश - Dance With Aurangzeb Photo

अहमदनगर शहरातील फकीरवाडा येथील दर्गाच्या उरूसमध्ये मुकुंदनगर भागात काही युवक औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. याप्रकरणी भिंगार पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Dance With Aurangzeb Photo
व्हिडिओ व्हायरल
author img

By

Published : Jun 5, 2023, 6:57 PM IST

Updated : Jun 5, 2023, 9:16 PM IST

औरंगजेबच्या फोटोसोबत डान्स

अहमदनगर: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो घेऊन एक तरुण नाचताना दिसत आहे. संदल मिरवणूक काढण्यात आलेली असताना औरंगजेबाचे पोस्टर्स झळकवत काही युवकांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

  • Anyone taking Aurangzeb's name will not be forgiven❗
    Aurangya's photos and name will not be tolerated, especially in Maharashtra !
    औरंगजेबाचे फोटो जर कोणी झळकवत असेल तर ते इथे मान्य केले जाणार नाही. भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि… pic.twitter.com/ddu2l9CUEe

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चौघांवर गुन्हा दाखल - अहमदनगर येथील उरूस मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या चौघांचा शोधदेखील पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये शहरातील फकीरवाडा परिसरात दमबारा हजारी दर्ग्याचा सदंल उरुस साजरा केला जात होता. काही तरुण डीजेच्या तालावर नाचत औरंगजेबाचे फोटो हातात घेऊन घोषणा देऊन दोन समाजात जातीय तेढ निर्माण होऊन द्वेष पसरेल असे कृत्य केल्याच्या आरोपावरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न: राज्य सरकारकडून अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी होळकरनगर करण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. मात्र, त्यामुळेच अहमदनगरचे वातावरण खराब करण्यासाठीच अशा प्रकारे औरंगजेबाचे फोटो झळकवले जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले..: या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारची भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगजेबाचे फोटो जर कोणी झळकवत असेल तर ते इथे मान्य केले जाणार नाही. महाराष्ट्रात आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत. कोणीही औरंजेबाचे नाव घेत असेल तर त्याला माफी मिळणार नाही.

शिवसेनेची मागणी: औरंगाबादच्या पोस्टच्या माध्यमातून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यातून दंगली घडवण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. याप्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात निघालेल्या मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर कोणी झळकत असेल तर यामागे कोण राजकारण करत आहे, हे जनतेसमोर यायलाच हवे अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.

हेही वाचा:

  1. Maharashtra Cabinet Expansion : मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार? फडणवीसांनी थेटच सांगितले....
  2. Illegal Schools Issue: अवैध शाळांवरील कारवाईकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष; विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ
  3. Mumbai HC On Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांना 'या' तारखेपर्यंत अटक करता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

Last Updated : Jun 5, 2023, 9:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.