ETV Bharat / state

पिंपळगावमध्ये टँकरद्वारे दुषित पाणीपुरवठा, ग्रामस्थांची नाराजी

पिंपळगाव देपा परीसरात पाणी पुरवठा करण्यासाठी प्रवरा नदीलगतच्या विहिरीवरुन टँकरने पाणी आणले जाते. हे पाणी भरत असतानाच पाणी फेसाळत असल्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या विहिरीचे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की अयोग्य यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पिंपळगावमध्ये टँकरद्वारे दुषित पाणीपुरवठा
author img

By

Published : May 7, 2019, 5:43 PM IST

Updated : May 7, 2019, 6:50 PM IST

अहमदनगर - दुष्काळात पाण्यासाठी होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. परंतु, या टँकरद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने दुष्काळी जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

पिंपळगावमध्ये टँकरद्वारे दुषित पाणीपुरवठा

संगमनेर तालुक्याच्या पठार भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने या भागाला टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तालुक्यातील पिंपळगाव देपामधील २०० लोकवस्तीच्या गोकूळवाडी आणि सुतारवाडीत आलेल्या टँकरमधून ग्रामस्थ पाणी भरत आहेत. परंतु, या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फेस होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या दूषित पाणी पुरवठ्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपळगाव देपा परीसरात पाणी पुरवठा करण्यासाठी प्रवरा नदीलगतच्या विहिरीवरुन टँकरने पाणी आणले जाते. हे पाणी भरत असतानाच पाणी फेसाळत असल्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या विहिरीचे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की अयोग्य यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे टँकर भरताना दूषित पाणीपुरवठा होत असतानादेखील याची कोणतीही माहिती संबंधितांनी प्रशासनाला देण्यात आले नाही. उलट टँकर भरून त्याद्वारे इच्छित स्थळी पाणी पुरवठा केला गेला आहे.

प्रवरा नदीकाठी दोन पाणी योजनांच्या विहिरी आहेत. या विहिरीलगतच गटारीचे पाणीदेखील नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्याचा पाझरदेखील लगतच्या विहिरींमध्ये होत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांच्या आहेत. शासकीय टँकरकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असताना प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञच असल्याचे समोर आले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ दुष्काळात पाण्यासाठी होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला खरा; परंतु या टँकरद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने दुष्काळी जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याच दिसुन आलय....

VO_ संगमनेर तालुक्याच्या पठार भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने या भागाला टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तालुक्यातील पळगाव देपामधील दोनशे लोकवस्तीच्या गोकूळवाडी आणि सुतारवाडीत आलेल्या टँकरमधुन ग्रामस्थ पाणी भरत असतांना पाण्याचा मोठ्या प्रमाणात फेस होत असल्याच निदर्शनास आलय त्या मुळे ग्रामस्थांनी या दूषित पाणी पुरवठ्या बद्दल नाराजी व्यक्त केली आहे....

BITE_बाळासाहेब गुंड, ग्रामस्थ गोकूळवाडी

BITE_ भीमबाई गुंड, ग्रामस्थ गोकूळवाडी

BITE_बाबाजी गुंड, ग्रामस्थ गोकूळवाडी

BITE_शोभा राऊत, ग्रामस्थ सुतारवस्ती

VO_ पिपळगाव देपा परीसरात पाणी पुरवठा करण्यासाठी प्रवरा नदीलगतच्या विहिरीवरुन टँकरले जातात हे टँकर भरत असतानाच पाणी फेसाळत असल्याचे काही फोटो व्हारयल झाले आहेत त्या मुळे या विहिरीचे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की अयोग्य यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. विशेष म्हणजे टँकर भरताना दूषित पाणीपुरवठा होत असतानादेखील याची कोणतीही माहिती संबंधितांनी प्रशासनाला दिली नाही. उलट टँकर भरून त्याद्वारे इच्छित स्थळी पाणी पुरवठा केला गेलाय....

BITE_सुरेश शिंदे, गटविकास अधिकारी.

VO_प्रवरानदी काठी दोन पाणी योजनांच्या विहिरी आहेत. या विहिरीलगतच गटारीचे पाणीदेखील नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्याचादेखील पाझर लगतच्या विहिरींमध्ये होत असल्याच्या परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. शासकीय टँकरकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असताना प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञच असल्याचे समोर आले आहे....
Body:7 May Shirdi Water Teankar ProblemConclusion:7 May Shirdi Water Teankar Problem
Last Updated : May 7, 2019, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.