ETV Bharat / state

शिर्डीतील राजकीय नेतेमंडळी कोरोनाच्या विळख्यात... - शिर्डीत कोरोनाचा शिरकाव

साईबाबांच्या या नगरीत आता राजकीय नेतेमंडळी देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले असून शिर्डी नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षांना कोरोनाची बाधा झाली आहे.

शिर्डी कोरोना अपडेट
शिर्डी कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 25, 2020, 11:04 AM IST

अहमदनगर - सबका मालिक एकचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत हळूहळू कोरोनाने शिरकाव केला असून शहरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. साई बाबांच्या या नगरीत आता राजकीय नेतेमंडळी देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले असून शिर्डी नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षांना कोरोनाची बाधा झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर गेली चार महिने आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी साईनगरीत एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नव्हता. त्यामुळे शिर्डी शहरातील नागरिकांच्या मनातील भीती नष्ट झाली आणि नागरिक घराबाहेर विनाकारण मुक्तसंचार करू लागले.

या दरम्यान आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि नगरपंचायतीच्या वतीने वारंवार सूचना करण्यात आल्या. तसेच दंडात्मक कारवाई करण्यता आली. मात्र, नागरिकांनी या कारवाईला न जुमानता विनाकारण घराबाहेर पडणे सुरूच ठेवले. त्याचे पडसाद मागील पंधरा दिवसांपासून शहरात दिसू लागले आहेत. शहरात रुग्णसंख्या वाढत असून आता हा आकडा 80 च्या वरती जाऊन पोहोचला आहे.

सर्वसाधारण नागरिकांसह राजकीय नेते मंडळी सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. शिर्डी शहरात आता बाधित लोकांबरोबर राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याने अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन ज्येष्ठ नेत्यांना बाधा झाल्याचे वृत्त शहरात वार्‍यासारखे पसरताच त्यांच्या संपर्कातील कार्यकर्त्यांनी धसका घेतला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.

कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणार्‍या लोकांनी स्वतःहून पुढे येऊन आपली नावे सांगावी, जेणेकरून कोरोनाची साखळी नष्ट करण्यासाठी प्रशासनाला मदत होईल, असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.