ETV Bharat / state

आरोपींची अनोखी शक्कल, कांद्याच्या पोत्यात गुटखा आणि तंबाखूची वाहतूक

author img

By

Published : Apr 24, 2020, 10:03 PM IST

कांद्याच्या पोत्यात चक्क गुटखा आणि तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

ahemdnagar
कांद्याच्या पोत्यात गुटखा आणि तंबाखूची वाहतूक करणारे आरोपी

अहमदनगर - कांद्याच्या पोत्यात चक्क गुटखा आणि तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे जण सोलापूर रोडने औरंगाबादकडे अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली टेम्पोतून कांद्याच्या पोत्यात गुटखा आणि तंबाखू घेऊन जात होते. वाहतूक करणारे दोघेही औरंगाबादचे आहेत.

अहमदनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जवळपास साडेपाच लाखाच्या मुद्देमालासह या दोघांना अटक केली आहे. या आरोपींना भिंगार कॅम्प पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. अहमदनगरच्या जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस पथकाने नगर-सोलापूर रोडवर छावणी बोर्डाच्या नाक्यावर सापळा लावला होता. मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो (क्रमांक एमएच 20- ई जी 8919) नाक्यावर येताच पोलिसांनी तो थांबवून तपासणी केली. त्यावेळी टेम्पोतील वीस कांद्याच्या गोण्यात खाली केल्यास त्यामध्ये हिरा कंपनीचा गुटखा आणि तंबाखूची पॅकेट्स लपवण्यात आल्याचे आढळले. विशेष म्हणजे आरोपींनी संशय येऊ नये, म्हणून टेम्पोच्या अग्रभागी काचेवर अत्यावश्यक सेवा असे स्टिकर लावलेले होते.

पोलिसांनी एकूण मुद्देमाल रुपये ५ लाख ४२ हजार २५६ जप्त करून आरोपी सलीम शेख (रा-वाळुंज, औरंगाबाद) आणि संतोष अशोक शिंदे (रा-पैठण, औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले. याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.