ETV Bharat / state

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 6 जणांना अटक, घातक हत्यारे जप्त - ARRESTED

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ६ जणांना संगमनेर शहर पोलिसांनी अटक केली आहे. संगमनेर परिसरातील तिरंगा रोड परिसरात पोलिसांनी दरोडेखोरांना अटक केली.

जप्त केलेली हत्यारे
author img

By

Published : Mar 8, 2019, 7:33 PM IST

अहमदनगर - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ६ जणांना संगमनेर शहर पोलिसांनी अटक केली आहे. संगमनेर परिसरातील तिरंगा रोड परिसरात पोलिसांनी दरोडेखोरांना अटक केली. आरोपींकडून ३ मोटारसायकलींसह मोठ्या प्रमाणात हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

या कारवाईने शहरात दरोड्याचा प्रकार घडण्याआधीच उघड झाला आहे. या कारवाईमुले पोलिसांचे कौतुक होत आहे. यातील ३ आरोपी पळून गेले होते. पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम, विजय पवार, सुभाष बोडखे, विजय खण्डीझोड, अमृत आढाव, साई तळेकर यांनी पाठलाग करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

शुक्रवारी पहाटे मालदाड रोडवरील तिरंगा चौकात काही संशयित हालचाली सुरु असल्याचा संशय शहर पोलिसांच्या गस्ती पथकाला आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मागोवा घेत त्यांना अटक केले. त्यांच्याकडून ३ मोटारसायकलसह करवत, कुर्‍हाड, गिरमीट मशीन, तलवार सुताची दोरी असा जवळपास 1 लाखाचा ऐवज जप्त केला आहे.

पोलिसांची कारवाई

याप्रकरणी, सचिन गोपीनाथ म्हस्कुले (वय 28, रा. धांरदरफळ), विजय लखन तामचीकर (वय 25, रा. राहुरी), भिमा बाजीराव डोके (वय 20, रा.धांदरफळ), राहुल अशोक गुंजाळ (वय 19, रा.निमज), गणेश संभाजी पर्बत (वय 24, रा.निंभाळे) व शेखर साहेबराव कातोरे (वय 28, रा.सांगवी) या 6 जणांना अटक केली असून त्यांच्यावर भा.द.वी.कलम 399, 402 सह भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उप अधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम करत आहेत.

Intro:
Shirdi_Ravindra Mahale

संगमनेरातील तिरंगा रोड परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना शहर पोलिसांच्या गुन्ह्रे प्रकटीकरन शाख्ने मोठ्या शिताफीने अटक केली आहे....आरोपीकडून तिन मोटार सायकलींसह मोठ्या प्रमाणात हत्यारे जप्त करण्यात आली आहे..या कारवाईने शहरातील ‘दरोड्या’चा प्रकार घडण्याआधीच उघड झाला असून शहरातून पोलिसांचे कौतुक होत आहे. यातील तीन आरोपी पळून गेले होते ,पोलीस उप निरीक्षक पंकज निकम , लांडे ,विजय पवार सुभाष बोडखे ,विजय खण्डीझोड , अमृत आढाव ,साई तळेकर यांनी पाठलाग करून यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या....

शुक्रवारी पहाटे मालदाड रोडवरील तिरंगा चौकात काही संशयीत हालचाली सुरु असल्याचा शहर पोलिसांच्या गस्ती पथकाला संशय आला. त्यांनी दबा धरुन त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता ते मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना आढळले..त्यांच्याकडून तिन मोटार सायकलसह करवत, कुर्‍हाड, गिरमीट मशीन, तलवार सुताची दोरी असा जवळपास एक लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अभय परमार bt याप्रकरणी पो.कॉ.सागर धुमाळ यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी सचिन गोपीनाथ म्हस्कुले (वय 28, रा.धांरदरफळ), विजय लखन तामचीकर (वय 25, रा.राहुरी), भिमा बाजीराव डोके (वय 20, रा.धांदरफळ), राहुल अशोक गुंजाळ (वय 19, रा.निमज), गणेश संभाजी पर्बत (वय 24, रा.निंभाळे) व शेखर साहेबराव कातोरे (वय 28, रा.सांगवी) या सहा जणांना अटक केली असून त्यांच्यावर भा.द.वी.कलम 399, 402 सह भारतीय हत्यार कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल केरण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपअधिक्षक अशोक थोरात, पो.नि.अभय परमार यांच्या मार्गदर्शनखाली पो.उ.नि.पंकज निकम करीत आहेत....Body:8 March Shirdi Sangamner Daroda Conclusion:8 March Shirdi Sangamner Daroda
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.