ETV Bharat / state

शिर्डीत एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा; बहीण-भावाचा मृत्यू

गुरुवारी उपवास सोडताना एकत्रित जेवण करताना जेवणात डाळभात, बटाटा, टमाटा चटणी हे पदार्थ खाण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच कृष्णा, श्रावणी, वैष्णवी व आजी भगीरथी गंगाधर सुपेकर या सर्वांना मळमळ, उलटयांचा त्रास होऊ लागला. उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता कृष्णा व श्रावणी या भावंडांचा मृत्यू झाला.

विषबाधा
शिर्डी
author img

By

Published : Dec 10, 2019, 10:42 AM IST

Updated : Dec 10, 2019, 11:39 AM IST

अहमदनगर- संगमनेर शहरात अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील दोन सख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्णा दिपक सुपेकर (६), श्रावणी दिपक सुपेकर(९) या बहिण-भावंडांचा मृत्यू झाला असून मोठी बहिण वैष्णवी दीपक सुपेकर (१३) यांच्यावर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा

मूळचे संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील दीपक गंगाधर सुपेकर व कुटुंब कामानिमित्त संगमनेर शहरात स्थायिक झाले आहेत. शहरातील मालदाड रोडवरील आंबेडकर नगर वसाहतीत वास्तव्याला आहेत. मोलमजूरी करुन सुपेकर आणि पत्नी मंगल आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

गुरुवारी (५ डिसेंबर) रात्री नऊ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे सर्वांनी उपवास सोडवत एकत्रित जेवण केले होते. जेवणात डाळभात, बटाटा, टमाटा चटणी हे पदार्थ खाण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच कृष्णा, श्रावणी, वैष्णवी व आजी भगीरथी गंगाधर सुपेकर या सर्वांना मळमळ, उलटयांचा त्रास होऊ लागला. पण काही वेळाने त्यांना परत बरे वाटू लागले.

दुसऱ्या दिवशी शुक्रवार (६ डिसेंबर) सकाळी पुन्हा त्यांना त्रास झाल्यानंतर चौघांनाही शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, कृष्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. श्रावणी हिच्यावर लोणी येथे औषधोपचार सुरु असताना अचानक तिचीही प्रकृती खालावल्याने रविवारी रात्री अकाराच्या सुमारास तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजी भगीरथी गंगाधर सुपेकर यांची प्रकृती स्थिर असून मोठी मुलगी वैष्णवी हिच्यावर शहरातील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

संगमनेर शहरात अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील दोन संख्या भावा बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कृष्णा दीपक सुपेकर (वय-६), श्रावणी दीपक सुपेकर (वय-९) ही बहीण भावंडे मयत झाली असुन मोठी बहिण वैष्णवी दीपक सुपेकर ( वय-१३) यांच्यावर संगमनेरमधील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत...

मूळचे संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील दीपक गंगाधर सुपेकर कुटुंब कामानिमित्त संगमनेर शहरात स्थायिक झाले आहे. शहरातील मालदाड रोडवरील आंबेडकर नगर वसाहतीत वास्तव्याला आहेत. मोलमजूरी करुन सुपेकर त्यांची पत्नी मंगल आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरुवार (५ डिसेंबर) रात्री नऊ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे सर्वांनी गुरुवारी उपवास सोडवत एकत्रित जेवन केले होते जेवनात दाळभात बटाटा टमँटो चटणी खालल्ली होकी मात्र त्यानंतर काहीवेळातच कृष्णा, श्रावणी, वैष्णवी व आजी भागीरथी गंगाधर सुपेकर या सर्वांना मळमळ, उलटयांचा त्रास होवू लागला. मात्र काही वेळाने त्यांना बरे वाटू लागले. दुसऱ्या दिवशी शुक्रवार (६ डिसेंबर) सकाळी पुन्हा त्यांना त्रास होवू लागल्यानंतर चौघांनाही शहरातील एका खासगी हॉस्पीटलमध्ये औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र कृष्णाची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याचा रविवार सकाळी मृत्यू झाला. श्रावणी हिच्यावर लोणी येथे औषध उपचार सुरु असताना अचानक तिचीही प्रकृती खालावल्याने रविवारी रात्री आकाराच्या सुमारास तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजी भागीरथी गंगाधर सुपेकर यांची प्रकृती स्थिर असून मोठी मुलगी वैष्णवी हिच्यावर शहरातील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे....

Bite मंगल सुपेकर आई

कृष्णा आणि श्रावणीच्या मृतदेहांवर शहरातील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुलांच्या आई-वडीलांचा हृदय पिळवटणारा आक्रोश होता. एका दिवसात घरातील दोन हस्ते-खेळते भाऊ बहिण यांचा मृतू झाल्याने नातेवाईक परिस्थितीपुढे हतबल आहेत.दरम्यान हा विषबाधेचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र विषबाधा नेमकी कशातून झाली हे अद्याप समजू शकलं नाही. मात्र नेमकी कशी काय विषबाधा झाली हा एकच प्रश्न सर्वत्र चर्चीला जात आहे.शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे....

Bite डॉ. अतुल आरोटे, आरोटे हॉस्पीटल संगमनेर

वैष्णवी सुपेकर अतिसार, उलटी आणि थंडीताप आजारांमुळे हॉस्पीटलमध्ये औषधोपचार घेत आहे. विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल....Body:mh_ahm_shirdi_poisoning_10_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_poisoning_10_visuals_bite_mh10010
Last Updated : Dec 10, 2019, 11:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.