अहमदनगर - भाजपमध्ये सुजय विखे-पाटील यांनी प्रवेश केल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या पोस्टरवरून गायब झाले होते. आज पुन्हा विखे-पाटील पोस्टरवर दिसत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचे श्रीरामपूर येथे प्रचार कार्यालय आहे. या कार्यालयाच्या पोस्टरवरील विखे-पाटील यांचा फोटो गायब झाला होता. त्यानंतर सगळ्याच पोस्टरवर विखे-पाटील यांचा फोटो गायब झाल्याचे पाहायला मिळत होते. पण, आज अचानक शिर्डी लोकसभा मतदारसंघात फिरत असलेल्या प्रचार वाहनांच्या बॅनरवर विखे व थोरात यांचा शेजारी-शेजारी असलेला फोटो पुन्हा दिसत आहे, त्यामुळे
चर्चेला उधाण आले आहे.