ETV Bharat / state

दूध उत्पादक शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांना पत्रे, आमदार मोनिका राजळेंची उपस्थिती - Mla monika rajale on milk issue

दूध उत्पादक शेतकर्‍यांना न्याय मिळावा यया मागणीसाठी राज्यभरात भाजपाकडून सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून आमदार राजळे यांच्या नेतृत्वाखाली हे पत्र पाठवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

दूध उत्पादक शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांना पत्र

author img

By

Published : Aug 22, 2020, 6:06 PM IST

पाथर्डी(अहमदनगर)- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने दूध दरवाढ मागणीची पत्रे पाठविण्यात आली. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डीतील पोस्ट कार्यालयातून ही पत्रे पाठविण्यात आली. यावेळी शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दूध उत्पादक शेतकर्‍यांना न्याय मिळावा यया मागणीसाठी राज्यभरात भाजपाकडून सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून आमदार राजळे यांच्या नेतृत्वाखाली हे पत्र पाठवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राजळे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

महाराष्ट्राच्या दूध उत्पादक शेतकर्‍यांना आजपर्यंत आघाडी सरकारने कोणताही न्याय दिला नाही. तसेच त्यांच्या मागणीची दखलही घेतली नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकरी उद्ध्वस्त होत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या दुधाला भाव मिळावा म्हणून भाजपा व मित्र पक्षाच्यावतीने तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला सुरुवात केली.

हे आंदोलन तीव्र करून आघाडी सरकारला जाग येण्यासाठी मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पत्र (पोस्ट कार्ड), ई-मेल, ट्विटर, फेसबुक, व्हाट्सअप इत्यादी माध्यमांतून दूध दरवाढ मागणी, दूध भुकटी अनुदान मागणी, निवेदने पाठविण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी व भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री यांना हजारोंच्या संख्येने पत्रे पाठवून, आघाडी सरकारला जागे करून, शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून वेळोवेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलने करण्यात येणार असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

यावेळी नगरसेवक प्रविण राजगुरू, संजय आव्हाड, अशोक सातपुते, महादेव सानप, किशन हातागले, सोपान काळोखे, गणेश पडवळकर, तुषार घोरपडे, ऋषिकेश मोहिते, प्रविण ढाकणे, महादेव गायके, कृष्णा मिसाळ आदी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या भावना मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.