ETV Bharat / state

पारनेर नगरसेवक प्रकरणावर पडदा; मात्र शिवसेना-राष्ट्रवादीतील खदखद न संपणारी.. - राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेनेला विचारात घेत नाहीत

पारनेर नगर पंचायतीच्या पाच शिवसेना नगरसेवकांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि अनेक घडामोडीनंतर पुन्हा घरवापसी चर्चेत राहिली. मात्र या निमित्ताने आता नगर जिल्ह्यात शिवसेना राष्ट्रवादीवर चांगलीच खट्टू झाली असून सेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी राष्ट्रवादीचे मंत्री आम्हाला जिल्ह्यात विचारात घेत नाहीत, अशी जाहीर टीका केली.

ahmednagar
शिवसेना-राष्ट्रवादी नेते
author img

By

Published : Jul 10, 2020, 9:24 PM IST

Updated : Jul 24, 2020, 5:20 PM IST

अहमदनगर - गेल्या आठवडाभर पारनेर नगर पंचायतीच्या पाच शिवसेना नगरसेवकांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि अनेक घडामोडीनंतर पुन्हा घरवापसी चर्चेत राहिली. खुद्द मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा विषय गांभीर्याने घेत मिलींद नार्वेकरांमार्फत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी करुन आपले नगरसेवक पुन्हा पक्षात आणले. मात्र या निमित्ताने आता नगर जिल्ह्यात शिवसेना राष्ट्रवादीवर चांगलीच खट्टू झाली असून सेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी राष्ट्रवादीचे मंत्री आम्हाला जिल्ह्यात विचारात घेत नाहीत, अशी जाहीर टीका करुन अजूनही सर्व आलबेल नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पारनेर नगरसेवक प्रकरणावर पडदा

अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर पारनेर नगरपंचायतीच्या त्या पाच नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पुन्हा हातातील घड्याळ काढून ठेवत शिवबंधन बांधले. मात्र तत्पूर्वी त्यांनी आमदार निलेश लंके यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाऊन घ्यायचा तो कानमंत्र घेतला. मातोश्री भेटीत माजी आमदार विजय औटी यांच्याबाबतचे नाराजी व्यक्त करणारे आणि शहराचा पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी करणारे पत्र सुपूर्द केले.

राजकीय विश्लेषकांनी ही घरवापसी तात्पुरती मलमपट्टी असून चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या पारनेर पंचायतीच्या निवडणुकीत हे नगरसेवक पक्षासोबत असतील, का याबाबत शंका व्यक्त केली आहे. एकूण या घडामोडीत आमदार निलेश लंके यांनी आपले तालुक्यातील स्थान अजून पक्के केले असून हा औटी यांना एक मोठा धक्का असल्याचेही सांगितले जात आहे. दुसरीकडे नगरसेवक पक्षांतर विषयाने जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे.

नगरचे माजी आमदार आणि शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला असून राष्ट्रवादीचे मंत्री जिल्ह्यात शिवसेनेला गृहीत धरीत नसल्याची तक्रार करत काही पक्ष शिवसेना संपवण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला आहे. आता पक्षांतर करणारे नगरसेवक आम्ही पाणी प्रश्नावर पक्षांतर केल्याचे आणि उद्धव ठाकरे यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याने आता नाराज नसल्याचे सांगत असले, तरी नगर जिल्ह्यात पारनेरसह नगर शहरात असलेला सेना-राष्ट्रवादी वाद हा उघड आहे. राठोड यांचे राष्ट्रवादीवरील आरोप हे त्याचेच द्योतक आहे. या परस्थितीत वरिष्ठ पातळीवर जरी सर्व आलबेल झाल्याचे चित्र असले, तरी भविष्यात या दोन्ही पक्षातील संघर्ष या ना त्या कारणाने पुन्हा पहावयास मिळाल्यास नवल वाटायला नको.

Last Updated : Jul 24, 2020, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.