ETV Bharat / state

Hivrebajar School : हिवारेबाजारमधील शाळा सुरूच राहणार; पालक-विद्यार्थी सभेत घेतला निर्णय - पालक-विद्यार्थी सभेत घेतला निर्णय

आदर्शगाव हिवरेबाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत पालक-विद्यार्थी सभा पार पडली. हिवरेबाजार येथील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरूच ठेवण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. पालकांनी आम्ही मुलांची काळजी घेत जबाबदारी घेऊ असे सांगत शाळा सुरू ठेवण्यात यावी असे मत मांडले.

पालक-विद्यार्थी सभा
पालक-विद्यार्थी सभा
author img

By

Published : Jan 12, 2022, 8:02 PM IST

Updated : Jan 12, 2022, 8:18 PM IST

अहमदनगर - राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य शासनाने 9 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून अनेक निर्बंध लागू केले आहेत. त्यात राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालये 16 फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षण क्षेत्रात आणि पालकांत नाराजीचा सूर आहे. विशेषतः शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचे भविष्य धोक्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) आदर्शगाव हिवरेबाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत पालक-विद्यार्थी सभा पार पडली. हिवरेबाजार येथील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरूच ठेवण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. पालकांनी आम्ही मुलांची काळजी घेत जबाबदारी घेऊ असे सांगत शाळा सुरू ठेवण्यात यावी असे मत मांडले.

हिवारेबाजारमधील शाळा बाबतचा आढावा
  • 'कमी प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी शाळा सुरू ठेवा'

पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले, की ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, अशा ठिकाणच्या शाळा बंद करू नयेत. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आहेत. हिवरेबाजारमध्येही रुग्ण नाहीत. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच शाळा अचानक बंद करणे म्हणजे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणीक नुकसान करणारे आहे. अशाने विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहेत. पालकांनी जबाबदारी घेतली तर शाळा सुरू ठेवल्या पाहिजेत, असे पवार म्हणाले.

  • 'पन्नास टक्के क्षमतेने शाळा सुरू ठेवा'

शासनाने निर्बंध आणताना अनेक व्यवसायांना पन्नास टक्के क्षमतेने व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. किमान असेच पन्नास टक्क्याचे धोरण शाळांबाबत घेतले पाहिजे. मात्र शाळा-महाविद्यालये पूर्णपणे बंद ठेवणे शैक्षणिक क्षेत्राचे विशेषतः विद्यार्थ्यांचे नुकसान करणारे आहे. त्यातून कधीही भरून न निघणारे नुकसान होत विद्यार्थ्यांचे भविष्य संपेल, असे मत पवार यांनी मांडले.

हेही वाचा - Mayor Kishori Pednekar : लस न घेणाऱ्यांचे ८४ टक्के मृत्यू! लस घेऊन सुरक्षित व्हा -किशोरी पेडणेकर

Last Updated : Jan 12, 2022, 8:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.